IND vs ZIM: 'आंघोळीला कमी पाणी वापरा' BCCIचा Team Indiaला नवीन नियम

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावरती आहे. येथे 18 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये वनडे सीरीज खेळवली जाणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावरती आहे. येथे 18 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. तसेच ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने खेळाडूंच्या आंघोळीबाबत काही सूचना दिल्या आहेत आणि त्याच वेळी, त्याचे पूल सेशन देखील कापले गेले आहे. यातून बीसीसीआयने खेळाडूंना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. (IND vs ZIM Use less water in the bath BCCI new rule for Team India)

Team India
JSCAमाजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

खरे तर, झिम्बाब्वेमधील हरारे जलसंकटाचा सामना करत आहे. येथे पाण्याची खूप टंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. अंघोळ करताना पाणी कमी वापरण्यास संघाला यावेळी सांगण्यात आले आहे.

वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. यासाठी खेळाडूंना पाण्याची बचत करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच संघाचे पूल सेशन देखील कापण्यात आले आहे.

याआधीही भारतीय संघाला परदेश दौऱ्यावर पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते, हे मात्र लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडिया 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही गेली होती आणि त्यावेळी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथे पिण्याच्या पाण्याचीही समस्या देखील होती. 2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना केपटाऊनला पाण्याचे संकट आले होते आणि तेथेही संघाला कमी पाणी वापरण्यास सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com