Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

IND vs WI, Shai Hope Century: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप याने तुफानी फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Shai Hope 5 Records
Shai Hope 5 RecordsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

IND vs WI, Shai Hope Century: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने तुफानी फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 50 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार लगावले. या विस्फोटक शतकामुळे त्याचा स्ट्राईक रेट 204 वर गेला. या मालिकेतील शे होपचे हे दुसरे शतक असून, भारतीय दौऱ्यावरील त्याचे एकूण चौथे शतक ठरले. या शानदार कामगिरीच्या जोरावर एकाच सामन्यात त्याने पाच मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

दरम्यान, या शतकी खेळीसह होप हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला. त्याच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3 शतके झाली. यापूर्वी ख्रिस गेल आणि एविन लुईस यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतके होती, ज्यांना त्याने मागे सोडले. याशिवाय, कोणत्याही द्विपक्षीय टी20 मालिकेत एकपेक्षा जास्त शतके झळकावणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी फिल साल्ट, संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि मोहम्मद एहसान यांनी हा पराक्रम केला होता.

Shai Hope 5 Records
IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण
Shai Hope 5 Records
IND vs WI: श्रेयस अय्यरने सांगितली टीम इंडियाच्या पराभवाची कारणं; गोलंदाजांवर नाराजी, अभिषेक शर्माचे केले कौतुक

विशेष म्हणजे, भारताच्या (India) विरोधात एकाच टी20 मालिकेत दोन शतके ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला. या सामन्यापूर्वी त्याने रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातही शतकी खेळी खेळली. या ऐतिहासिक शतकादरम्यान शे होपने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आपल्या दोन हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. हा पराक्रम करणारा तो वेस्ट इंडिजचा चौथा खेळाडू ठरला. त्याच्या या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिज संघाने निर्धारित षटकांत 247 धावांचा डोंगर उभा केला आणि सामन्यात आपली स्थिती अत्यंत मजबूत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com