India vs Sri Lanka 3T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज (7 जानेवारी) राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 16 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्याला तिसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. यासाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. चला जाणून घेऊया, तिसर्या T20 सामन्याची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
शुभमन गिल पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिल्या T20 सामन्यात त्याने 7 धावा आणि दुसऱ्या T20 सामन्यात 5 धावा केल्या. अशा परिस्थितीत मालिका जिंकण्यासाठी तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. त्याचवेळी सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले होते.
चौथ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीला आणखी एक संधी मिळू शकते. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाचव्या क्रमांकावर उतरण्याची खात्री आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या दीपक हुड्डाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदरला श्रीलंकेविरुद्धच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंगने एकट्याने 7 नो बॉल टाकले. त्याचबरोबर यजुवेंद्र चहललाही आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्या मुकेश कुमारचे पदार्पण करु शकतो. उमरान मलिक आणि शिवम मावी यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अक्षर पटेलला फिरकीपटू म्हणून संधी मिळू शकते. पटेलने गेल्या सामन्यात झंझावाती खेळी केली होती, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.