Baba Vanga लाही 'या' व्यक्तीने टाकले मागे, भारत-श्रीलंका सामन्याबाबतचा अंदाज ठरला अचूक!

Ind vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Ind vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 160 धावाच करु शकला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज शिवम मावी. त्याने 4 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले.

या व्यक्तीचा अंदाज अचूक होता

ओग्गी नावाच्या युजरने ट्विटरवर या सामन्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. सामना संपण्याच्या सुमारे 2 तास आधी त्याने ट्विट केले होते, टीम इंडिया हा सामना 2 धावांनी जिंकू शकते. ओग्गीचा अंदाज खरा ठरला आणि टीम इंडियाने (Team India) हा सामना 2 धावांनी जिंकला.

Team India
IND vs SL: 'कदाचीत पराभूत झालो असतो, पण...' हार्दिककडून अक्षरला 20वी ओव्हर देण्याचे कारण स्पष्ट

ही होती सामन्याची स्थिती

दीपक हुड्डाने तूफान फटकेबाजी केली. त्याचबरोबर, नवोदित शिवम मावीने चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर दीपक हुड्डाने (23 चेंडूत नाबाद 41) युवा खेळाडूंनी सजलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. हुड्डा आणि अक्षर पटेल (20 चेंडूत नाबाद 31) यांनी 38 चेंडूत 68 धावांची शानदार भागीदारी करुन भारताला पाच बाद 162 धावांपर्यंत नेले. अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेचा संघ 160 धावांवर बाद झाला.

Team India
IND vs SL: पहिल्या T20 मधूनच झाले स्पष्ट, 'या' खेळाडूला बेंचवर बसून पाहावी लागणार मालिका!

तसेच, श्रीलंकेच्या (Sri Lanka) फिरकीपटूंसमोर 94 धावांत पाच गडी गमावून भारतीय संघ अडचणीत आला होता, मात्र हुड्डाने 23 चेंडूत एक चौकार आणि चार षटकार ठोकले, तर अक्षरने 20 चेंडूंत नाबाद 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या वेगवान गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली पण श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने 27 चेंडूंत तीन चौकार आणि षटकारांसह संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. वानिंदू हसरंगा (10 चेंडूत 21 धावा) आणि चमिका करुणारत्ने (16 चेंडूत नाबाद 23) यांनीही आक्रमक फलंदाजी करत संघाला शेवटपर्यंत सामन्यात रोखले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com