IND vs SL: मोहम्मद सिराजने केला मोठा खुलासा, श्रीलंकेविरुद्ध 'या' खास प्लॅनने...

Mohammad Siraj: भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला.
Mohammad Siraj
Mohammad SirajDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammad Siraj On His Match Winning Spell: भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला.

मोहम्मद सिराजने तूफानी गोलंदाजी करत श्रीलंकेला या सामन्यात टिकू दिले नाही. सिराज या सामन्याचा 'हिरो' ठरला. सिराजच्या या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत ऑलआउट झाला.

टीम इंडियाने (Team India) अवघ्या 37 चेंडूत हे लक्ष्य गाठले. सामन्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मोठा खुलासा केला.

मोहम्मद सिराजची चमकदार कामगिरी

सिराजने विस्फोटक गोलंदाजी करत सात षटकात 21 धावा देत सहा बळी घेतले. सिराजने या सामन्यात पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दसुन शनाका आणि कुसल मेंडिस यांना आपला बळी बनवले.

यातील 3 खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. या शानदार कामगिरीनंतर सिराजने आपल्या यशाचे रहस्य सांगितले.

Mohammad Siraj
IND vs SL Final: श्रीलंकेने जिंकला 'टॉस', विराट-बुमराहसह 'या' 5 खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन; पाहा प्लेइंग-11

सिराजनं केला मोठा खुलासा

आपल्या प्लॅनबद्दल बोलताना मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) म्हणाला, 'हे एखाद्या स्वप्नासारखे वाटते. मागच्या वेळी मी तिरुअनंतपुरम श्रीलंकेविरुद्ध अशीच कामगिरी केली होती.

त्यावेळी मला सुरुवातीला 4 विकेट्स मिळाल्या होत्या, पण पाच बळी मिळवता आला नाही. तुमच्या नशिबात जे आहे तेच तुम्हाला मिळते हे तेव्हा लक्षात आले. मात्र, आज फारसा प्रयत्न केला नाही. मी नेहमी व्हाइट बॉलच्या क्रिकेटमध्ये स्विंग पाहतो.

गेल्या सामन्यात फार काही करता आले नाही. पण आज स्विंग होता आणि मला आऊट स्विंगवर जास्त विकेट मिळाल्या. त्याचबरोबर इथे बिर्याणी नव्हती.'

Mohammad Siraj
IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यानंतर चाहत्यांमध्येच जुंपली, हाणामारी करतानाचा Video व्हायरल

एकाच षटकात 4 विकेट घेतल्या

सिराजच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ केवळ 15.2 षटकेच टिकू शकला, जी भारताविरुद्धची वनडेतील त्याची दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. त्याने सामन्याच्या चौथ्या षटकात पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या.

उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर, सिराज एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील चौथा गोलंदाज बनला आणि एका षटकात चार विकेट घेणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजाने हा पराक्रम केला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com