INDvsSL: ज्याची भीती होती तेच झालं! भारताच्या ताफ्यात कोरोना; सामना स्थगित

सध्या भारताचे सर्व खेळाडू विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
India vs Sri Lanka T20 postponed after Krunal Pandya tests positive for COVID
India vs Sri Lanka T20 postponed after Krunal Pandya tests positive for COVIDDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आला आहे , त्यामुळे मंगळवारी होणारा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

सध्या भारताचे सर्व खेळाडू विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत असून प्रत्येकाची परीक्षा नकारात्मक झाल्यास दुसरा टी -20 सामना बुधवारी खेळला जाईल.

क्रुणालला कोरोना झाल्यांनतर आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला रवाना होतील की सध्या श्रीलंकेत थांबतील याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. यावर आधीपासूनच चर्चा सुरू होती, परंतु सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला मान्यता दिली होती.

पहिल्या टी -20 मध्ये क्रुणालने फक्त दोन ओव्हर टाकत 16 धावा देऊन 1 विकेट घेतला होता.याशिवाय फलंदाजीत त्याने नाबाद 3 धावा केल्या होत्या .क्रुणालच्या अगोदर कोरोनाने इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातही प्रवेश केला होता.

India vs Sri Lanka T20 postponed after Krunal Pandya tests positive for COVID
IPL 2021: स्मिथ, वॉशिंगटन, गिल आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात भारताने श्रीलंकेचापराभव केला होता . दुसरा टी -20 जिंकून टीम इंडियाला वन डे सारखीच ही मालिका सुद्धाविजयी करायची होती. टीम इंडियाच्या काही खेळाडूंना कोरोनाचा फटका बसण्याची भीती आधीच होती.आणि अशातच आता कुणाल पॊजिटिव्ह आल्याने ही भीती अधिकच वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com