IND vs SA: वनडे मालिकेत भारत जिंकणार की, दक्षिण आफ्रिका !

यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) कसोटीनंतर वनडे मालिकाही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये या दोन संघांची आतापर्यंतची आकडेवारी कशी होती, ते समजून घेऊया...
IND vs SA
IND vs SADainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका बुधवारपासून सुरु होत आहे. ही तीन सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे. कसोटी मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. सेंच्युरियनमध्ये (Centurion) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघाने उर्वरित दोन्ही सामने गमावले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पहिली कसोटी जिंकूनही भारतीय संघ (Team India) मालिका जिंकण्यापासून दूर राहिला. टीम इंडियाला वनडे मालिका जिंकून याची भरपाई करायची आहे. त्याचबरोबर यजमान दक्षिण आफ्रिका कसोटीनंतर वनडे मालिकाही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये या दोन संघांची आतापर्यंतची आकडेवारी कशी होती, ते समजून घेऊया...

दरम्यान, एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 84 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यातील 35 सामन्यांमध्ये भारताच्या वाट्याला विजय मिळाला आहे. भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर भारताने सहा सामन्यांची वनडे मालिका 5-1 अशी जिंकली.

IND vs SA
शंभराव्या कसोटीत बीसीसीआयने विराटला कर्णधारपदाची दिली होती ऑफर पण...

दुसरीकडे, जर आपण दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी भारतापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 46 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, म्हणजेच भारतापेक्षा 11 सामने जास्त. या बाबतीत त्यांचा वरचष्मा असल्याचे दिसतो. त्याच वेळी, असे एकूण नऊ सामने झाले आहेत, जे एकतर रद्द झाले किंवा काही कारणास्तव त्यांचे निकाल येऊ शकले नाही.

तसेच, गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली, ज्यांचे निकाल आले, तर यात भारताला मोठा फायदा झाला आहे. भारताने चार-पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले असून एक सामना दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेने हे सामने त्यांच्याच घरच्या मैदानावर गमावले आहेत.

मात्र, दोन्ही देशांमधील शेवटची एकदिवसीय मालिका कोरोनामुळे झाली नव्हती. मार्च 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची होती परंतु कोरोनामुळे ही मालिका रद्द करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com