IND vs SA: कोहली आणखी एका विक्रमाला गवसणी घालत विराट दर्शन घडवणार !

नोव्हेंबर 2019 पासून सुरु असलेली शतकाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. मात्र, कोहलीची (Virat Kohli) बॅट धावा आणि रेकॉर्ड मोडण्यास विसरलेली नाही.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. नोव्हेंबर 2019 पासून सुरु असलेली शतकाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. मात्र, कोहलीची बॅट धावा आणि रेकॉर्ड मोडण्यास विसरलेली नाही. पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये माजी नंबर वन फलंदाजाने (Virat Kohli) पुन्हा चमत्कार केला. (IND vs SA Virat Kohli is on his way to another record)

दरम्यान, कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 51 धावा केल्या, जे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 63 वे अर्धशतक होते. या अर्धशतकासह कोहलीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 37 व्यांदा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. आशियाई फलंदाजांमध्ये तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli
IND vs SA: KL राहुलने मैदानात उतरताच रचला इतिहास

तसेच, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या (Kumar Sangakkara) नावावर SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळा वनडेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने 126 डावात 38 वेळा ही अद्भुत कामगिरी केली.

विशेष बाब म्हणजे कोहलीने केवळ 89 डावांमध्ये 37 वेळा ही कामगिरी केली असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या तर केवळ 91 डावांमध्ये तो हा विक्रम मोडेल.

Virat Kohli
IND vs SA: विराटने मोडला मास्टर ब्लास्टरचा विक्रम, आफ्रिकेत फडकवला झेंडा!

शिवाय, संगकारा आणि कोहली यांच्यानंतर या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) तिसरा आशियाई खेळाडू आहे. सचिनने 132 डावात 34 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com