विराट कोहली जेव्हा-जेव्हा क्रिजवर येतो, तेव्हा-तेव्हा कोणते ना कोणते विक्रम मोडीत काढतो. असाच काहीसा प्रकार पारलमधील बोलंड पार्कमध्ये घडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 धावा करत विराट कोहलीने (Virat Kohli) सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला.
दरम्यान, विराट कोहली हा परदेशी भूमीवर भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) परदेशी भूमीवर 5065 वनडे धावा केल्या होत्या.
तसेच, विराट कोहलीने सचिनपूर्वीचा 42 वनडे डावांचा विक्रम मोडला. विराट कोहलीने परदेशात 104 एकदिवसीय डाव खेळले असून त्याची सरासरी 60 च्या आसपास आहे. विराटने परदेशी भूमीवर 20 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने परदेशात 146 एकदिवसीय डावांमध्ये 37.34 च्या सरासरीने 5065 धावा केल्या, त्यात 12 शतकांचा समावेश आहे.
शिवाय, विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून भलेही फॉर्ममध्ये नसेल, परंतु तो त्याच्या पिढीतील प्रत्येक खेळाडूपेक्षा सरस ठरत आहे. तसेच, बोलंड पार्क वनडेमध्ये विराट कोहलीने 27 धावा केल्याबरोबर राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्याही पुढे गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडने 1309 धावा आणि सौरव गांगुलीने 1313 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.