IND vs SA T20: ऋषभ पंतने धोनीला मागे टाकत नावावर केला खास विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात ऋषभ पंतने एक मोठा विक्रम केला आहे.
Rishabh Pant Sets Special Record
Rishabh Pant Sets Special Record Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात ऋषभ पंतने (Rishabh Pant) एक मोठा विक्रम केला आहे. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधारपद भूषवले आणि भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. (IND vs SA T20 Rishabh Pant sets a special record by beating Mahendra Singh Dhoni)

Rishabh Pant Sets Special Record
T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला पुन्हा मिळाली संधी

कमी वयात भारताचे कर्णधार बनण्याचा विक्रम माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाच्या नावावरती आहे. सुरेश रैनाने वयाच्या 23 व्या वर्षी भारताचे नेतृत्व केले. ऋषभ पंतने हा क्षण त्याच्या कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले.

पंत हा भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार

ऋषभ पंतने 24 वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. अशाप्रकारे सुरेश रैनानंतर पंत हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

त्याच वेळी, जेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला तेव्हा त्याचे वय 26 वर्ष होते. तसेच ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार असणारा चौथा यष्टिरक्षक आहे. यापूर्वी सय्यद किरमाणी, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले.

Rishabh Pant Sets Special Record
रिकी पाँटिंगने केला नव्या संघाशी 3 वर्षांचा करार, दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदी कोण?

दिनेश कार्तिक तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणार आहे

या मालिकेसाठी दिनेश कार्तिक 3 वर्षानंतर भारतीय संघामध्ये परतला आहे. या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी केली आहे. या यष्टिरक्षक फलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी शानदार कामगिरी केली आहे.

याशिवाय हार्दिक पांड्याचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आह तर यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com