न्यूझीलंडविरुध्द कसोटी मालिका जिंकूनही टीम इंडियापुढे संघनिवडीचा पेच...

मुंबई कसोटीत भारताने न्यूझीलंडचा (New Zealand) 372 धावांनी एकतर्फी पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई कसोटीत भारताने न्यूझीलंडचा (New Zealand) 372 धावांनी एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाला (Team India) चौथ्या दिवशी 5 विकेट्सची गरज होती. न्यूझीलंडचे काम पहिल्या एका तासात तमाम केले. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. टीम इंडियाने मालिका जिंकली मात्र असे असतानाही त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाचा पुढील दौरा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) आहे, जिथे त्यांनी एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची (Rahul Dravid) ही पहिलीच मोठी परीक्षा असेल, परंतु यात तो कसा पास होणार हा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या अडचणीची 5 मोठी कारणे खालीलप्रमाणे जाणून घ्या...

विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये नाही- टीम इंडियाने मुंबई कसोटीत मोठा विजय नोंदवला परंतु त्याचा कर्णधार विराट कोहली अजूनही फॉर्ममध्ये नाही. गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहलीने शतकही केलेले नाही. तो मुंबई कसोटीलाही मुकला. विराट कोहलीला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या डावात त्याला मोठे शॉट खेळता आले नव्हते. तो केवळ 36 धावांवर बाद झाला. विराट कोहली, राहुल द्रविड आणि टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आउट ऑफ फॉर्म फलंदाज म्हणून जाणे अजिबात योग्य नाही.

Team India
ENG vs IND: पाचव्या कसोटीत अजिंक्यला डच्चू, बुमराहला विश्रांती, अश्विन संधी?

अजिंक्य रहाणेच्या फॉर्मला अजूनही ग्रहणच लागलेले आहे. रहाणे कानपूर कसोटीत म्हणावी तशी कामगिरी करु शकला नव्हता. तसेच त्याला मुंबईतही संधी मिळाली नाही. रहाणेला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले परंतु कुठेतरी या खेळाडूची कारकीर्द आता अडचणीत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहाणेसाठी दक्षिण आफ्रिकेत खेळणे खूप कठीण आहे. आता टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या रुपाने त्याचा पर्यायही मिळाला आहे.

चेतेश्वर पुजारालाही बऱ्याच दिवसांपासून शतक झळकावता आलेले नाही. त्याची बॅट अद्याप शांतच आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही पुजारा अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. पुजाराने 3 डावात 23.75 च्या सरासरीने केवळ 95 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारावर विश्वास ठेवणे थोडे कठीण झाले आहे. टीम इंडियानेही पुजाराला पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

Team India
IND vs NZ: मुंबई कसोटीत रविचंद्रन अश्विन करणार 'ट्रिपल सेंच्युरी'

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इशांत शर्माही (Ishant Sharma) काही करु शकला नाही. इशांत शर्माला कानपूर कसोटीत एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मुंबई कसोटीत संधी मिळाली नाही. इशांत शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूसाठी फॉर्ममध्ये नसणे ही द्रविडसाठी मोठी समस्या आहे. दक्षिण आफ्रिकेची मालिका जिंकण्यासाठी अनुभवाची गरज असेल परंतु आता इशांतची निवडही अवघड वाटत आहे.

शिवाय, शुभमन गिलला टीम इंडियाचे भविष्य म्हटले जाते, परंतु तो ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, ते पाहता हे सांगणे जरा घाईचे होईल. गिलने कसोटी मालिकेत 36 च्या सरासरीने 144 धावा केल्या पण तो त्याच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घेत नाहीये. जसे की, गिल अजूनही या स्विंग बॉल्सवर विकेट गमावत आहे आणि सेट असूनही तो अचानक आऊट होत आहे. टीम इंडिया गिलकडे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पाहत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com