IND vs PAK Match: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 वनडे खेळले जाणार आहेत.
संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहे, कारण या दोन देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही.
भारत आणि पाकिस्तान फक्त विश्वचषक किंवा आशिया चषक सामन्यांमध्ये एकमेकांशी क्रिकेट सामने खेळतात.
विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात यंदा आशिया चषक आणि विश्वचषकाचे एकूण 5 सामने खेळले जाऊ शकतात.
आशिया चषक 2023 या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. आशिया कप 2023 स्पर्धेच्या ग्रुप स्टेज आणि सुपर फोर स्टेजसह भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात.
भारत आणि पाकिस्तान या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यास दोघांमध्ये एकूण 3 सामने खेळले जाऊ शकतात. आशिया चषक 2023 यावर्षी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल.
आशिया चषक 2023 नंतर भारत आणि पाकिस्तान 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत.
वृत्तानुसार, या वर्षी भारतात होणारा 2023 विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
आयसीसी 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल, ही मोठी माहिती समोर आली आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ विश्वचषकाच्या अंतिम किंवा उपांत्य फेरीत आमनेसामने आले तर दोघांमध्ये एकूण 2 सामने खेळले जाऊ शकतात.
अशाप्रकारे आशिया चषक आणि विश्वचषकाचे सामने मिळून एकूण 5 वेळा भारत आणि पाकिस्तानची लढत पाहायला मिळणार आहे.
बीसीसीआयने भारतीय संघ व्यवस्थापनासोबत बैठक घेतली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाच्या फायद्यांचा विचार करुन 2023 विश्वचषक सामन्यांचे ठिकाण ठरवण्याबाबत चर्चा झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकाचे सामने अशा ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे, जिथे खेळपट्टी संथ आहे आणि फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते.
या विश्वचषकाचा घरच्या मैदानावर पुरेपूर फायदा घ्यायचा असल्याने संथ खेळपट्ट्यांना प्राधान्य द्यायचे आहे, असे टीम इंडियाने बोर्डाला सांगितले. 12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने जिंकले होते.
अशा परिस्थितीत, यावेळी तो 2023 विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.