Ind Vs Eng: बुमराह व शामीच्या गोलंदाजीपुढे इंग्लंड फलंदाज ढेपाळले

इंग्लंड पहिला डावात 183 धावांत ऑलआऊट (Ind Vs Eng)
Ind Vs Eng: 1st Test Report, on the Image of Rohit Sharma, 04 Aug, 2021
Ind Vs Eng: 1st Test Report, on the Image of Rohit Sharma, 04 Aug, 2021Tweeter / @ICC
Published on
Updated on

भारत विरुद्ध इंग्लंड (Ind Vs Eng) यांच्यामध्ये आज (बुधवार) पहिल्या कसोटी सामन्याला (1st Test Match) सुरवात झाली. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या जिव्हारी लागला. इंग्लंड संघ तिसऱ्या सत्रापर्यंत फक्त 183 धावांवर आटोपला (England all out on183). जसप्रीत बुमराह व मोहम्मद शामी या भारताच्या धारदार गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले. (Bumrah 4 Wkts and Shami 3Wkts )

Ind Vs Eng: 1st Test Kohli and Bumrah celebrating after England all out on 183 runs, 04 Aug, 2021.
Ind Vs Eng: 1st Test Kohli and Bumrah celebrating after England all out on 183 runs, 04 Aug, 2021.Tweeter / @ICC

इंग्लंड तर्फे सर्वाधिक 64 धावा कर्णधार जो रूटने बनवल्या (Captain Joe Route 64 Runs). तर भारतातर्फे जसप्रीत बुमराह ने 46 धावा देत इंग्लंड 4 (4/46) फलंदाजांना तंबूत धाडले. सुरुवातीला पडझड झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाने 138 धावांमध्ये 3 गडी गमावून डाव सावरला. परंतु त्यानंतर इंग्लिश फलंदाज सपेशल गडगडले. बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद शमी 3 गडी शार्दुल ठाकूर 2 गडी तर मोहम्मद सिराज ने 1 गडी बाद केला.

Ind Vs Eng: 1st Test Report, on the Image of Rohit Sharma, 04 Aug, 2021
Goa Sports: केपे शासकीय महाविद्यालयाचे क्रिडा क्षेत्रातील योगदान अतुलनीय

भारताने पहिल्या इंग्लंडचे रोरी बर्ग्ज व क्रावली या 2 फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमीने डॉम सिंब्लेला बाद केले. त्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी सावध पवित्रा स्वीकारला. तरीही सत्राच्या शेवटी शामीने बेअरस्ट्रोला सुद्धा तंबूत धाडले. चहापानानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. व 183 धावांमध्ये इंग्लंडचे सर्व फलंदाज ठराविक अंतराने बाद गेले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने दिवसअखेर 13 षटकांत बिनबाद 21 धावा (India 0/21) बनवल्या असून रोहित शर्मा व के एल राहुल प्रत्येकी नऊ (Rohit Sharma & K L Rahul both not out on 9 Runs each) धावांवर नाबाद राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com