IND vs ENG: 'सूर्या ने मेरा मर्डर...,' या इंग्लिश गोलंदाजाने सांगितला किस्सा

Moeen Ali on Suryakumar Yadav: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Moeen Ali on Suryakumar Yadav: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाचा सामना आता अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज मोईन अलीने सूर्यकुमार यादवचा जुना सामना आठवला. या जागतिक स्पर्धेत सूर्यकुमार दमदार फॉर्ममध्ये आहे.

सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये

टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सूर्यकुमार सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने तीन सामन्यांत अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या सामन्यात त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 61 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याने पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्धही अर्धशतके झळकावली होती. मुंबईचा हा फलंदाज प्रथमच आयसीसी स्पर्धेत सहभागी झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्येही खेळतो.

Suryakumar Yadav
IND vs ENG: चाहत्यांसाठी मोठी बातमी, टीम इंडिया सामना न खेळता अंतिम फेरीत पोहचणार?

मोईनने एक जुनी गोष्ट सांगितली

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) यावर्षी नॉटिंगहॅमचा किस्सा आठवला. सूर्यकुमार यादवने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला होता. अलीने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, 'जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी तो (सूर्याकुमार) एक आहे. त्याने टी-20 क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तो असा खेळाडू आहे, ज्याला तुम्ही गोलंदाजी करु शकत नाही जेव्हा तो चांगला खेळत असतो. तेव्हा त्याची कमजोरी कळत नाही. '

Suryakumar Yadav
IND vs ENG: भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी आले मोठे अपडेट, या खेळाडूंनी वाढवली चिंता

सूर्यकुमारने शतक झळकावले होते

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या वर्षी 10 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. त्यानंतर नॉटिंगहॅमच्या मैदानावर त्याने 117 धावांची इनिंग खेळली. मात्र, 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा करता आल्या. सूर्यकुमारने 55 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार ठोकले. मोईन अलीने त्या सामन्यात 15.5 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या पण डावाच्या 19 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर सूर्यकुमारची विकेट पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com