IND vs ENG: चाहत्यांसाठी मोठी बातमी, टीम इंडिया सामना न खेळता अंतिम फेरीत पोहचणार?

T20 WC 2022 Semi Final: भारताचा सामना 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs England, T20 WC 2022 Semi Final: टीम इंडिया व्यतिरिक्त, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे, तर भारताचा सामना 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे. हे सामने जिंकणारा संघ 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळेल. पण टीम इंडियाला उपांत्य फेरीचा सामना न खेळताही अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी आहे, पण ती कशी होईल, हे आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी विशेष नियम

भारत आणि इंग्लंड (England) यांच्यातील हा सामना अ‍ॅडलेड ओव्हलवर होणार आहे. यावेळी उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामन्याचा निकाल लागला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना पूर्ण होऊ शकतो. त्याच वेळी, डकवर्थ-लुईस नियम तेव्हाच वापरला जाईल जेव्हा दोन्ही संघ किमान 10-10 षटके खेळले असतील. मात्र पावसामुळे हा सामना दोन्ही दिवशी खेळला गेला नाही तर त्यांच्या गटात अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. टीम इंडिया (Team India) आपल्या गटात अव्वल स्थानावर आहे, अशा परिस्थितीत तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Team India
IND vs ENG: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाची लॉटरी, विराट-रोहितचा सर्वात मोठा शत्रू जखमी

अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये पावसाची शक्यता

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. या दिवशीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, पावसाची शक्यता केवळ 4 टक्के आहे. मात्र, सामन्याच्या दिवशी अ‍ॅडलेडमध्ये ढगाळ वातावरण असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी, न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्याच्या दिवशी 50 टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. हा सामना न खेळल्यास न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

Team India
IND Vs ENG: भारत-इंग्लंड सामन्यापूर्वी मोठा बदल, या तगड्या खेळाडूचा संघात प्रवेश!

स्टँडबाय खेळाडू - शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.

T20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अ‍ॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

Team India
IND W vs ENG W: भारतीय महिला संघाने 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे मालिका

स्टँडबाय खेळाडू - टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com