लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी (India vs England, 2nd Test) भारताने शानदार फलंदाजी करताना इंग्लंडला 272 धावांचे लक्ष्य दिले. ऋषभ पंत निश्चितपणे लवकर बाद झाला त्याच्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांच्या उत्साहाला ब्रेक लावला.
या दोन्ही फलंदाजांनी 9 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाला 8 बाद 298 पर्यंत नेले, त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. शमी आणि बुमराहची ही खेळी पाहून माजी कसोटी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्यांचा प्रशंसक बनला. त्याने या भागीदारीची तुलना लक्ष्मण आणि द्रविड यांच्या भागीदारीशी केली जी त्यांनी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाटनर्शिप केली होती.
विरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हटले की 'मौज कर दी. शमी-बुमराह तुम्हाला सलाम. कॉमेंट्री दरम्यान सेहवाग शमी आणि बुमराहच्या शॉट सिलेक्शनमुळे खूप प्रभावित झाला. शमी आणि बुमराहने त्यांच्या डावादरम्यान उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्ह मारला. हे पाहून सेहवाग स्तब्ध झाला. तो म्हणाला की, विराट कोहलीने अद्याप असे फटके मारले नाहीत जे हे फलंदाज लगावत होते.
बटलर-वुड बुमराहशी भिडले
इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली. 92 व्या षटकाच्या शेवटी मार्क वुडने जसप्रीत बुमराहला काहीतरी सांगितले, त्यानंतर या खेळाडूने त्याला उत्तर दिले. यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर बुमराहला असं काही तरी बोलला की त्याचा पारा अधिकच वाढला. दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक चकमक झाली मात्र अखेर पंचांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. ही स्लेजिंग इंग्लंडच्या खेळाडूंसाठी खूप जिव्हारी लागली आहे. बुमराह आणि शमी क्रीजवर थांबले. दोघांनी अनेक आकर्षक शॉट्स मारले.
विशेषत: मोहम्मद शमीने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबले. शमीने 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. शमीने अर्धशतकासाठी केवळ 57 चेंडू खेळले. त्याने मोईन अलीच्या चेंडूवर 92 मीटर लांब षटकार ठोकला. मोहम्मद शमीने नाबाद 56 आणि जसप्रीत बुमराहनेही नाबाद 34 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.