IND vs AUS: शमीनं जिंकली मनं! मैदानातून फरफटत बाहेर नेणाऱ्या फॅनसाठी केलं असं काही...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान स्टेडियमची सुरक्षा भेदत एक चाहता मैदानात घुसला होता.
India vs Australia, 2nd Test | Fan invades Pitch
India vs Australia, 2nd Test | Fan invades PitchDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून खेळला जात आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना सुरू असतानाच पहिल्याच दिवशी एक चाहता स्टेडियमची सुरक्षा भेदत मैदानात घुसला होता. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

India vs Australia, 2nd Test | Fan invades Pitch
IND vs AUS: 'हे सोपं नव्हे!', टीम इंडियाकडून 100 व्या कसोटीच्या पुजाराला स्पेशल शुभेच्छा, पाहा Video

झाले असे की शुक्रवारी या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ सुरू होता. यावेळी ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत असताना एक चाहता स्टेडियमच्या बॅरीकेड्सवरून उडी मारून आत मैदानात आला. तो धावत मैदानात आल्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. हे सुरक्षा रक्षक त्याला मैदानातून फरफटत बाहेर नेत होते.

पण याचवेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुढे आला आणि तो सुरक्षा रक्षकांना थांबवून त्यांच्याशी बोलताना दिसला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला उभे राहून दिले आणि त्यानंतर त्यांनी त्याला बाहेर नेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच अनेकजण शमीचे कौतुकही करत आहेत.

India vs Australia, 2nd Test | Fan invades Pitch
IND vs AUS: श्रेयसचं कमबॅक, तर सुर्या आऊट! दुसऱ्या कसोटीसाठी पाहा दोन्ही संघांची Playing XI

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. भारताने श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला प्लइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्यांनी मॅट रेनशॉ ऐवजी ट्रेविस हेड याला आणि स्कॉट बोलंडच्या जागेवर मॅथ्यू कुहनेमन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे हा सामना चेतेश्वर पुजाराचा कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. त्यामुळे त्याला त्याच्या या 100 व्या कसोटीनिमित्त खास कॅप भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते देण्यात आली. पुजारा १०० कसोटी खेळणारा भारताचा 13 वा खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com