IND vs AUS: काय झालं कांगारुंना, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची खेळपट्टीबाबत तक्रार; म्हणाले...

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे.
IND vs AUS
IND vs AUSDainik Gomantak

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. मात्र, हा सामना सुरु होण्याआधी खेळपट्टीबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले.

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे गळाटले. त्याचवेळी, या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज शानदार फलंदाजी करताना दिसले. परंतु ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा एकदा खेळपट्टीबाबत तक्रार करताना दिसले.

ऑस्ट्रेलियन फलंदाज काय म्हणाला

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब याने गुरुवारी भारताविरुद्धच्या (India) चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर कबूल केले की, नागपूरची खेळपट्टी आमच्या संघासाठी योग्य नाही.

IND vs AUS
IND vs AUS Video: शमी-सिराजचे ऑसी ओपनर्सला जबरदस्त धक्के! पहिल्या कसोटीत टीम इंडियाची दमदार सुरुवात

दुसरीकडे, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) (5/47) आणि रविचंद्रन अश्विन (3/42) यांनी आठ विकेट्स घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचे अनेक फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 1 बाद 77 अशी आघाडी घेतली.

IND vs AUS
IND vs AUS: आनंद अन् अभिमान! लेकाचं कौतुक करण्यासाठी आई मैदानात, KS Bharat चा भावूक क्षण व्हायरल

तसेच, या सामन्यात 31 धावा करणाऱ्या हँड्सकॉम्बने टीम इंडियाच्या गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला की, 'भारतीय गोलंदाजांनी लाईन-लेन्थवर गोलंदाजी केली, ज्यामुळे आम्हाला धावा काढण्याची संधीच मिळाली नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com