IND vs AFG: कधी खेळवळी जाणार भारत-अफगाणिस्तान वनडे मालिका? BCCI सचिव जय शाह यांची पुष्टी

India vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात आगामी वनडे मालिकेबद्दल जय शाह यांनी महत्त्वाची अपडेट्स दिली आहे.
India vs Afghanistan
India vs AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI secretary Jay Shah Confirms India vs Afghanistan ODI Series Will Be played in January 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्वोच्च परिषेदेची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी वेळापत्रकाबद्दलही चर्चा झाली.

दरम्यान, या बैठकीनंतर जय शाह यांनी भारत आणि अफगाणिस्तान संघातील आगामी वनडे मालिकेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

खरंतर भारत आणि अफगाणिस्तान या दोन पुरुष संघात जूनमध्ये ४ सामन्यांची वनडे मालिका होणार होती. मात्र, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यातील परस्पर समजूतीने ही मालिका स्थगित करण्यात आळी होती. ही मालिका २३ ते ३० जून दरम्यान होणार होती.

India vs Afghanistan
BCCI Chief Selector: शिक्कामोर्तब झालं! अजित आगरकर भारतीय संघाचा नवा 'चीफ सिलेक्टर'

आता या मालिकेबद्दल टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्यावृत्तानुसार जय शाह यांनी सांगितले आहे की भारत आणि अफगाणिस्तान संघातील मालिका जानेवारी २०२४ मध्ये खेळवली जाणार आहे.

याशिवाय जय शाह यांनी पुढील चार वर्षात भारतात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांसाठी नवीन मीडिया राईट्सचे करारबद्दलही अंतिम निर्णय ऑगस्टच्या अखेरीपर्यंत घेण्यात येईल.

जय शाह यांनी म्हटले, 'बीसीसीआयचा नवीन मीडिया करार ऑगस्ट अखेरीपर्यंत होईल. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ८ सामन्यांच्या मालिकांनी होईल.'

भारताला वर्ल्डकप 2023 पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच वर्ल्डकपनंतर 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. वनडे वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Afghanistan
एशियन गेम्स, इम्पॅक्ट प्लेअर अन् स्टेडियम सुधारणा..., BCCI च्या बैठकीत झाले 5 महत्त्वाचे निर्णय

एशियन गेम्समध्ये खेळणार भारतीय संघ

बीसीसीआयच्या बैठकीदरम्यान चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्समधील भारतीय संघाच्या सहभागाबद्दलही निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांच्या सहभागासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ खेळताना दिसणार आहेत.

तसेच एशियन गेम्स आणि वर्ल्डकप 2023 या स्पर्धांचा कालावधी साधारण एकत्र आल्याने बीसीसीआय ज्या खेळाडूंना वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळणार नाही, अशा काही खेळाडूंना एशियन गेम्ससाठी भारतीय संघात संधी देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com