पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतियाने धडाकेबाज फलंदाजी करत गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजय मिळवून दिला. या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार राशिद खानचीही वेगळी झलक पाहायला मिळाली. राशिदने आपल्या फिरकीचा जलवा पुन्हा एकदा दाखवला. पंजाबच्या दिग्गजांना त्याने आसमान दाखवले. राशिदने सामन्यात 3 बळी घेतले. लिव्हिंगस्टोन, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शाहरुख खानसारख्या (Shah Rukh Khan) फलंदाजांना बाद करुन पंजाबचे (Punjab Kings) 200 धावा करण्याचे स्वप्न भंगले. राशिदने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. गुजरातच्या उपकर्णधाराने धवनला यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले. तर दुसरीकडे, शतकाच्या अगदी जवळ पोहचलेल्या लिव्हिंगस्टोनही बाद झाला. राशिदने शॉर्ट बॉलवर लिव्हिंगस्टोनला बाऊंड्रीवर झेलबाद करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दरम्यान, लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची तुफानी खेळी खेळली. लिव्हिंगस्टोनला बाद केल्यानंतर राशिदने शाहरुख खानलाही आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. शाहरुखने 8 चेंडूत 15 धावा केल्या. खरं तर याच षटकात राशिदने लिव्हिंगस्टोन आणि शाहरुखला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्याने पंजाब संघाची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचण्यापासून रोखली गेली.
तसेच, पंजाबविरुद्धच्या सामन्यात 2 बळी घेतल्यानंतर राशिदने आता आयपीएलमध्ये 98 बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेण्यापासून राशिद फक्त 2 विकेट दूर आहे. गुणतालिकेत गुजरात आता दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबला पराभूत केल्यानंतर आता गुजरात टायटन्ससाठी दिलासादायक बाब आहे, टायटन्सचा संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.