इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या हंगामात आठ ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. स्पर्धा सुरू होण्याच्या 14 दिवस आधी सर्व दहा संघांचे कर्णधार निश्चित करण्यात आले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने शनिवारी (12 मार्च) फाफ डू प्लेसिसला त्यांचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. तो विराट कोहलीची जागा घेणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांचे नेतृत्व केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्याकडे आहे. आठ संघांनी भारतीय तर दोन संघांनी परदेशी खेळाडूंना कर्णधार बनवले आहे.
मुंबई इंडियन्स: पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची कमान यावेळीही रोहित शर्माच्या हाती आहे.
चेन्नई सुपर किंग्स: भारताच्या महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चेन्नई संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन कर्णधार पद सांभाळेल.
दिल्ली कॅपिटल्स: गेल्या तीन मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती आहे.
सनरायझर्स हैदराबाद: आयपीएल 2016 च्या चॅम्पियन टीम सनरायझर्स हैदराबादचे कर्णधार केन विल्यमसनच्या हाती आहे.
लखनऊ सुपर जायंट्स: नवीन आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सने भारतीय सलामीवीर केएल राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
गुजरात टायटन्स: मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला नवीन आयपीएल फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स: दोन वेळा आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेणारा कर्णधार श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
पंजाब किंग्स: आयपीएलचा सर्वात दुर्दैवी संघ म्हटल्या जाणाऱ्या पंजाब किंग्सने पुन्हा एकदा नवीन कर्णधाराची निवड केली आहे. त्यांनी मयंक अग्रवालची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.