Spain Beats Costa Rica: स्पेनकडून कोस्टारिकाचा धुव्वा; 7-0 गोलफरकाने एकतर्फी विजय

कोस्टारिकाचा दुबळा प्रतिकार; फेरान टोरेसचे दोन गोल
Spain Vs Costa Rica
Spain Vs Costa RicaDainik Gomantak

Spain Beats Costa Rica: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी ग्रुप ई मधील स्पेन विरूद्ध कोस्टारिका सामना अत्यंत एकतर्फी ठरला. स्पेनने कोस्टरिकाचा अक्षरशः धुव्वा उडवला. स्पेनने कोस्टारिकावर एकामागोमाग एक असे एकुण 7 गोल केले. तर प्रत्युत्तरात कोस्टारिकाला एकही गोल करता आला नाही. स्पेनच्या आक्रमणापुढे कोस्टारिकाचा बचाव अत्यंत दुबळा ठरला. हा सामना स्पेनने तब्बल 7-0 अशा गोलफरकाने जिंकला.

(FIFA World Cup 2022)

Spain Vs Costa Rica
Japan Beats Germany: पिछाडीवरून जपानची जर्मनीवर मात; 2-1 ने केले पराभूत

फर्स्ट हाफपर्यंत स्पेनने कोस्टा रिका संघावर 3-0 अशी आघाडी घेतली होती. कोस्टारिकाचे खेळाडू सामना खेळताहेत असे वाटतच नव्हते. स्पेनच्या खेळाडुंनी त्यांना चांगलाचे सतावले.

सामन्याच्या 11 व्या मिनिटाला स्पेनच्या दानी ओल्मो याने पहिला गोल नोंदवला. त्याने पेड्रीच्या पासवर जबरदस्त ड्रिबलिंग करत कोस्टारिकाचा दिग्गज गोलकीपर कॅलोल नवास याला चकवत हा गोल केला. त्यानंतर छोट्या पासेसवर स्पेनने लक्ष केंद्रित केले. 21 व्या मिनिटाला त्यांनी दुसरा गोल नोंदवत गोलआघाडी आणखी एका गोलने वाढवली. रियल माद्रिद क्लबसाठी खेलणाऱ्या अनुभवी मार्को असेन्सियो याने स्पेनकडून दुसरा गोल नोंदवला.

Spain Vs Costa Rica
FIFA World Cup Matches In Inox: थिएटरमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार; गोव्यासह 'या' शहरांत आयनॉक्स करणार Live स्क्रीनिंग

त्यानंतरही स्पेनचे आक्रमण सुरूच राहिले. सामन्याच्या 31 व्या मिनिटाला कोस्टारिकाच्या पेनल्टी बॉक्समध्ये डुआर्ते याने स्पेनच्या जोर्डी अल्बा याला पाडले. त्यामुळे पंचांनी स्पेनला पेनल्टी किक बहाल केली. फेरान टोरेस याने यावर कोणतीही चूक केली नाही. त्याने चेंडूला थेट गोलपोस्टमध्ये पाठवले. त्यानंतर सेकंडहाफमध्येही स्पेननेच वर्चस्व राखले. फेरान टोरेस याने 54 व्या मिनिटाला मैदानी गोलची नोंद केली. तर गावी याने 74 व्या मिनिटाला स्पेनकडून पाचवा गोल नोंदवत गोल आघाडी वाढवली. त्यानंतरही स्पेनचे आक्रमण सुरूच राहिले. 90 व्या मिनिटाला स्पेनच्या कार्लोस सोलेर याने मैदानी गोलची नोंद केली. तर भरपाई वेळेमध्ये अल्वाराे मोराता यानेही एक गोल नोंदवला.

स्पेनने 2010 चा वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान, या ग्रुपमध्ये जपान आणि जर्मनीचाही समावेश आहे. पैकी बुधवारीच झालेल्या सामन्यात जपानने जर्मनीला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे गुणतक्क्यात उलटफेर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com