Japan Beats Germany: पिछाडीवरून जपानची जर्मनीवर मात; 2-1 ने केले पराभूत

सामन्याच्या अखेरच्या 15 मिनिटात जपानकडून उत्कृष्ट खेळाचे दर्शन
Japan Beats Germany:
Japan Beats Germany:Dainik Gomantak

Japan Beats Germany: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी ग्रुप ई मध्ये झालेल्या जर्मनी विरूद्ध जपान सामन्यात सुरवातीच्या 70 मिनिटाच्या काळात 1-0 ने पिछाडीवर असतानाही जर्मनीवर मात केली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये जपानने खेळ उंचावत जर्मनीला पराभूत केले. हा सामना जपानने 2-1 अशा गोलफरकाने जिंकला. जर्मनीने चार वेळा वर्ल्डकप जिंकला आहे तर जपानने एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. गतवर्षी जर्मनी संघ वर्ल्डकपच्या पहिल्या राऊंडमध्येच बाहेर पडला होता.

(FIFA Football World Cup 2022)

Japan Beats Germany:
FIFA World Cup Matches In Inox: थिएटरमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार; गोव्यासह 'या' शहरांत आयनॉक्स करणार Live स्क्रीनिंग

जपानचा गोलकीपर साकाई हा डेव्हिड राऊम याला रोखण्याच्या प्रयत्नात त्याच्यावर पडला, त्यामुळे पंचांनी जर्मनीला पेनल्टी बहाल केली. जर्मनीच्या इलकाय गुंदोगान याने 33 व्या मिनिटाला पेनल्टीवर मिळालेल्या संधीचा लाभ घेत पहिला गोल नोंदवला. यामुळे जर्मनीने 1-0 अशी आघाडी घेतली. फर्स्ट हाफमध्ये ही आघाडी कायम राहिली. जर्मनीच सामना जिंकेल की काय असे वाटत असताना अखेरच्या 15-20 मिनिटांत जपानने उत्तम खेळ केला. 75 व्या मिनिटाला जपानच्या रित्सु दोआन याने मैदानी गोल नोंदवला.

71 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून रित्सु दोआन मैदानात आला होता. त्याने चारच मिनिटात गोल करून जपानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेचच आठ मिनिटांनी 83 व्या मिनिटाला जपानच्या ताकुमा असानो याने जपानकडून दुसरा गोल नोंदवत जर्मनीवर आघाडी घेतली. जपानचा हा दुसरा गोल जर्मनीसाठी धक्का होता.

Japan Beats Germany:
First Women Referee In FIFA World Cup: फ्रान्सच्या स्टेफनीने रचला इतिहास; फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बनली पहिली महिला रेफ्री

उवर्रीत मिनिटांच्या खेळात आणि नंतरही भरपाई वेळेत जर्मनीला ही आघाडी फेडता आली नाही. जपानने 2-1 अशा गोलफरकाने जर्मनीला पराभूत केले. या सामन्यात जर्मनीचा संघ हॉट फेव्हरिट मानला जात आहे. तथापि, यापुर्वी सौदी अरेबियानेही बलाढ्य अर्जेंटिनाला पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला आहे. संपुर्ण सामन्यात जर्मनीनेच चेंडुवर नियंत्रण राखले. पासिंगमधील अचूकताही जपानच्या तुलनेत जर्मनीचीच चांगली होती. पण अखेरच्या टप्प्यात जपानने बाजी मारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com