Cricket Hat-trick: जरा हटकेच! 2 दिवस अन् 3 षटकांत मिळून घेतलेली हॅट्रिक, 35 वर्षांपूर्वीचा पराक्रम

Merv Hughes: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाजाने 35 वर्षांपूर्वी 3 षटकांत मिळून हॅट्रिक घेण्याचा अनोखा पराक्रम केला होता.
Merv Hughes
Merv HughesDainik Gomantak
Published on
Updated on

Merv Hughes hat-trick:

क्रिकेटच्या मैदानात कधी हवेहवेसे, तर कधी नकोसे विक्रम नेहमीच होताना दिसत असतात. काही विक्रम तर खूपच दुर्मिळ असतात. त्यात हॅट्रिकचाही समावेश आहे.

क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे काही सोपी गोष्ट नाही. पण अनेकांना हे माहित नसेल की ऑस्ट्रेलियाचा मर्व्ह ह्युजेस हे असे खेळाडू आहे, त्यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी, दोन वेगवेगळ्या डावात आणि तीन वेगवेगळ्या षटकात मिळून त्यांची हॅट्रिक पूर्ण केली आहे.

मर्व्ह ह्युज यांची हॅट्रिक

ही घटना 1988 साली 2 ते 6 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पर्थ येथे झालेल्या सामन्यातील आहे. तर झाले असे की या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. कर्णधार व्हीव रिचर्ड्स यांनी 146 धावांच्या खेळीही साकारली होती. पण वेस्ट इंडिजने अखेरचे 5 विकेट्स 28 धावांच्या अंतरातच गमावल्या.

दरम्यान या डावात ह्युजेस यांनी 5 विकेट्स घेतल्या. यातील चौथी विकेट त्यांनी कर्टली अँब्रोसच्या रुपात घेतली. ही विकेट त्यांनी 122 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतली.

त्यानंतर 124 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी पॅट्रिक पॅटरसनटला बाद करत त्यांची वैयक्तिक पाचवी विकेट घेतली, तर ही वेस्ट इंडिजच्या डावातील 10 वी विकेट ठरली. त्यामुळे त्यांचा पहिला डाव 123.1 षटकात 449 धावांत संपुष्टात आला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांचा पहिला डाव 8 बाद 395 धावा करून घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरला. यावेळी ह्युजेस यांनी षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गोर्डन ग्रिनीज यांना बाद केले.

त्यामुळे ह्युजेस (Merv Hughes) यांनी एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्याने त्यांच्या नावावर हॅट्रिकची नोंद झाली.

Merv Hughes
WWC च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना! भारत अन् ऑस्ट्रेलिया बनले साक्षीदार

विशेष म्हणजे अशा प्रकारे हॅट्रिक (hat-trick) घेणारे ते एकमेव गोलंदाज आहेत. दरम्यान त्यांनी वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात एकूण 8 विकेट्स घेतल्या. म्हणजेच एकूण संपुर्ण सामन्यात 13 विकेट्स घेतल्या. तरी त्यांच्या चांगल्या कामगिरीनंतरही वेस्ट इंडिजने हा सामना पुढे जाऊन 169 धावांनी जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com