भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अनेक अर्थांनी खास होता. परंतु, या सामन्यात एक गोष्ट अशी घडली जी महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाली. वास्तविक भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Australia) सामन्यात 3 शतकी भागीदारी पाहायला मिळाली. महिला विश्वचषकात (Women's World Cup) यापूर्वी कोणत्याही सामन्यात असे घडले नव्हते. यापैकी 2 भागीदारी विजयाच्या प्रतिक ठरल्या, तर एक शतकी भागीदारी पराभवाचे कारण बनली. (The India-Australia match saw a 3 century partnership)
दरम्यान, पहिल्यांदा विजयी भागीदारीबद्दल बोलूया. रॅचेल हेन्स आणि अॅलिसा हिली यांच्यातील शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला गेला. या दोघींमध्ये 117 चेंडूत 121 धावांची भागीदारी झाली. याशिवाय विजयामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) आणि एलिस पेरी (Alice Perry) यांनी शानदार फलंदाजी करत शतकी भागीदारी उभारली. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 123 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली.
तसेच, या सामन्यात भारताकडूनही शतकी भागीदारी झाली. मात्र, ती भागीदारी विजयाची साक्षीदार होऊ शकली नाही. त्यांनी भारताची धावसंख्या 277 धावांपर्यंत नेली. परंतु, ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग केला. भारतासाठी मिताली राज (Mithali Raj) आणि यस्तिका भाटिया यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी झाली. दोघींनी मिळून 154 चेंडूत 130 धावा केल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.