Pakistani Cricketer: 'या' पाकिस्तानी क्रिकेटरला दिले होते विष, शाहिद आफ्रिदीने 40-50 लाख रुपये देऊन...

Pakistan Cricket News: नुकतेच रमीझ राजा यांना पाकिस्तानच्या प्रमुखपदावरुन हटवण्यात आले तेव्हा खळबळ उडाली होती.
Shahid Afridi
Shahid AfridiDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket News: पाकिस्तानी क्रिकेटबाबत रोज नव नवीन खुलासे समोर येतात. नुकतेच रमीझ राजा यांना पाकिस्तानच्या प्रमुखपदावरुन हटवण्यात आले तेव्हा खळबळ उडाली होती.

किंवा त्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले तेव्हाही गोंधळ झाला होता. पाकिस्तानमध्ये हे खूप सामान्य आहे. यातच, आणखी एका पाकिस्तानी खेळाडूची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

पाकिस्तानचा माजी सलामीवीर इम्रान नाझीरने धक्कादायक खुलासा केला आहे. करिअरच्या शिखरावर असताना आपल्याला विषबाधा झाल्याचा दावा इम्रानने केला.

1999 ते 2012 या कालावधीत पाकिस्तानकडून खेळलेल्या नाझीरने गेल्या वर्षी आपल्या आजारांबंधी खुलासा केला होता.

पाकिस्तानसाठी (Pakistan) आठ कसोटी आणि 79 एकदिवसीय सामने खेळलेल्या नाझीरने सांगितले की, अलीकडेच त्याचा एमआरआय करण्यात आला तेव्हा त्याला विषबाधा झाल्याचे आढळून आले.

Shahid Afridi
India vs Pakistan Cricket: शाहिद आफ्रिदी म्हणतोय, 'मोदी साहेबांना विनंती करणार...'

त्याने सांगितले की, हे एक विष होते ज्याचा परिणाम हळूहळू झाला. हे विष माणसाच्या सांध्यांवर परिणाम करते आणि दीर्घकालीन नुकसान करते. त्याने पुढे सांगितले की, माझ्या सांध्यावर 8-10 वर्षांपासून उपचार करण्यात आले.

इम्रानने असेही सांगितले की, 6-7 वर्षांपासून तो सांध्याच्या आजाराने त्रस्त होता, परंतु देवाच्या कृपेने तो कधीही अंथरुणाला खिळला नाही. इम्रानने सांगितले की, त्याला अनेक लोकांवर संशय होता, पण त्याला कोणी काय खायला दिले हे समजू शकले नाही.

Shahid Afridi
Pakistan Cricket: बाबर आझमला मोठा झटका, शादाब खान बनला टीम पाकिस्तानचा नवा कर्णधार

शाहिद आफ्रिदीने मदत केली

इम्रान नझीरनेही आपल्या आयुष्याची बचत या आजारावर उपचार करण्यात खर्च केल्याचा खुलासा केला.

नझीरने सांगितले की, या कठीण काळात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याला वाईट काळात खूप मदत केली. शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) त्याच्या उपचारासाठी 40-50 लाख रुपये खर्च केल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान लवकर बरे व्हावे, असे आफ्रिदीने डॉक्टरांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com