Virat Kohli complete 100 Catches in IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने 7 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात बेंगलोरने राजस्थानसमोर 190 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 6 बाद 182 धावाच करता आल्या. दरम्यान, क्षेत्ररक्षण करत असताना बेंगलोरचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जयस्वालचा शानदार झेल घेतले.
याबरोबरच विराटने आयपीएलमधील क्षेत्ररक्षक म्हणून 100 वा झेल पूर्ण केले. त्यामुळे तो 100 झेल घेणारा तिसराच क्षेत्ररक्षक ठरला. यापूर्वी सुरेश रैना आणि कायरन पोलार्ड यांनीच असा कारनामा केला आहे.
107 - सुरेश रैना
103 - कायरन पोलार्ड
101 - विराट कोहली
98 - रोहित शर्मा
93 - शिखर धवन
92 - एबी डिविलियर्स
या सामन्यात बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तसेच फाफ डू प्लेसिसने 62 धावांची खेळी केली. विराट मात्र फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. तो पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. बेंगलोरने या सामन्यात 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 6 बाद 182 धावाच करता आल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने 52 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने धावा केल्या. तसेच ध्रुव जुरेलने 34 धावांची नाबाद खेळी केली. तसेच बेंगलोरकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या.
बेंगलोरचा हा 7 सामन्यांमधील चौथा विजय ठरला. मात्र, राजस्थानचा तिसरा पराभव ठरला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.