ICC Women ODI Rankings: मिताली राजला मोठा धक्का, तर झूलन गोस्वामीचे 'बल्ले-बल्ले'

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर हे रँकिंग समोर आले आहे.
Jhulan Goswami
Jhulan GoswamiTwitter/ @ICC
Published on
Updated on

आयसीसीच्या महिला क्रिकेटच्या (Indian Women Cricket Team) लेटेस्ट रँकिंग घोषित करण्यात आली आहे. यामध्ये भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे, तर एक खेदपूर्ण बातमी आहे. या अंतर्गत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) आयसीसी फलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थानात घसरण झाली आहे. आता ती तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. यापूर्वी ती चौथ्या क्रमांकावर होती. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर हे रँकिंग समोर आले आहे. या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताला 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामध्ये मिताली राजला पहिली वनडे वगळता चांगली कामगिरी करता आली त्यामुळे तिच्या रॅंकिंगमध्ये घसरण झाली असून दक्षिण आफ्रिकेच्या लीज लीने 761 रेटिंगसह अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे, झुलन गोस्वामीने गोलंदाजीमध्ये चमत्कार केला असून तिला त्याचा क्रमवारीत फायदा झाला आहे तिने तीन एकदिवसीय सामन्यामध्ये चार विकेट्स घेतल्या. यामुळे तिचे रेटिंग 727 झाले. गोलंदाजी क्रमवारीत फक्त ऑस्ट्रेलियाची जेस जॉन्सन (Jess Johnson) तिच्या पुढे असून तिचे रेटिंग 760 आहेत.

Jhulan Goswami
ICC Women ODI Rankings: मिताली राज वनडे क्रमवारीत अव्वलच, पहा टॉप 10

गोलंदाजी रँकिंगची अशी स्थिती

गोलंदाजी क्रमवारीत फक्त ऑस्ट्रेलियाची जेस जोनासेन झुलनच्या पुढे आहे. तिचे रेटिंग 760 आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट एका स्थानाच्या नुकसानासह 717 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अन्या श्रुबसोल आणि इंग्लंडच्या केट क्रॉसची गोलंदाजी जोडी अनुक्रमे नवव्या आणि 10 व्या स्थानासह पहिल्या 10 मध्ये आल्या आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन बळी घेणाऱ्या श्रबसोलने चार स्थानांची प्रगती केली आहे. क्रॉसने पाचव्या एकदिवसीय सामन्यात 44 धावा देऊन तीन बळी घेतले, ज्यामुळे तिला पाच स्थानांचा फायदा झाला.

Jhulan Goswami
ICC Test Rankings: जो रुट बनला जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज

बेथ मुनीने आठ स्थानांची झेप घेतली

ऑस्ट्रेलियाची बेथ मूनीने फलंदाजी क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचली आहे. त्याची सहकारी लेनिंग सातव्या स्थानावर आहे. मूनीने भारताविरुद्ध 89.84 च्या स्ट्राईक रेटने एक शतक आणि अर्धशतकासह 177 धावा केल्या. अष्टपैलूंच्या यादीत ऐश गार्डनरने चार स्थानांची प्रगती करत सहावे स्थान गाठले आहे. खराब फॉर्ममुळे एलिस पेरी दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली असून दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कौपला अव्वल स्थानी पोहोचली आहे. भारताच्या दीप्ती शर्मा एका स्थानाच्या नुकसानीसह पाचव्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com