T20 Ranking: सूर्याचा जलवा, ICC T20 Ranking मध्ये धडक मोहीम

ICC T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी T20 क्रमवारी जाहीर केली आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

Latest T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी T20 क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा चॅम्पियन फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्या झंझावाती कामगिरीच्या जोरावर ताज्या T20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे, तर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमसह सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या पाचमध्ये सामील झाला आहे.

जगातील नंबर 1 फलंदाज बनण्याची शर्यत

टी-20 विश्वचषकापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनण्याची शर्यत अधिक तीव्र झाली आहे. कॉनवे हा न्यूझीलंडमध्ये (New Zealand) सुरु असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. कॉनवे पहिल्या पाच टी-20 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. मागील सामन्यात बांगलादेशविरुद्ध नाबाद 70 आणि पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) नाबाद 49 धावा करुन कॉनवेने अ‍ॅरॉन फिंच आणि डेव्हिड मलानला मागे टाकले आहे. त्याचे सध्या 760 रेटिंग गुण आहेत.

Suryakumar Yadav
ICC T20 Rankings: बाबर आझमची खुर्ची हिरावून घेतली, रिझवान बनला नंबर वन फलंदाज

एकदिवसीय क्रमवारीत धवन 6 स्थानांनी घसरला

एकदिवसीय क्रमवारीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारताने मालिका जिंकल्यानंतरही शिखर धवनच्या क्रमवारीत 6 अकांनी घसरण झाली आहे. भारताचा सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासह 17 व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दोघांचीही क्रमवारीत घसरण झाली, त्यांच्यापुढे एकमेव भारतीय फलंदाज आहे.

Suryakumar Yadav
ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर कायम, अय्यरने घेतली गरुडझेप

कुलदीप यादवचे बल्ले-बल्ले

दुसरीकडे, क्विंटन डी कॉकची खराब फॉर्ममुळे क्रमवारीत घसरण झाली आहे, ज्यामुळे इमाम-उल-हक एकदिवसीय क्रमवारीत क्रमांक 2 वर पोहोचला आहे. श्रेयस अय्यर, हेनरिक क्लासेन आणि संजू सॅमसन यांनी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये पोहोचले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट घेत कुलदीप यादव अव्वल 25 मध्ये पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com