Player of the Month: डिसेंबरमधील बेस्ट क्रिकेटरच्या शर्यतील दोन भारतीय खेळाडू, ICC ने जाहीर केली नामांकने

ICC POTM: आयसीसीने डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत.
India Women's Cricket Team
India Women's Cricket TeamX/BCCIWomen
Published on
Updated on

ICC Announced Women's and Men's Player of the Month nominees for December 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूला पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी आधी तीन-तीन खेळाडूंना नामांकन देण्यात येते. दरम्यान डिसेंबर 2023 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी आयसीसीने नामांकने जाहीर केली आहेत.

डिसेंबर 2023 मधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंमध्ये एकही भारतीय नाही, मात्र महिलांमध्ये जेमिमाह रोड्रिग्स आणि दिप्ती शर्मा यांना नामांकन मिळाले आहे.

या दोघींशिवाय झिम्बाब्वेची प्रिशियस मरांगे हिला देखील नामांकन मिळाले आहे. तसेच पुरुषांच्या विभागात पॅट कमिन्स, तैजुल इस्लाम आणि ग्लेन फिलिप्स यांना नामांकन मिळाले आहे.

India Women's Cricket Team
ICC Awards 2023: सर्वोत्तम क्रिकेटरसाठी कोहली-जडेजाची वर्ल्डकप फायनलमध्ये नडणाऱ्या दोन ऑस्ट्रेलियन्सशी टक्कर

दिप्ती - जेमिमाहची शानदार कामगिरी

डिसेंबर 2023 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने कसोटी मालिका खेळली, तसेच भारताची इंग्लंडविरुद्ध टी20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकाही या महिन्यात झाली. या सर्व मालिकांमध्ये जेमिमाह आणि दिप्ती यांची कामगिरी शानदार राहिली.

जेमिमाहने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतके केली.तसेच तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत पहिल्या सामन्यात 82 तर दुसऱ्या सामन्यात 44 धावांची खेळी केली. तिने या महिन्यात 369 धावा केल्या.

याशिवाय दिप्तीने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात तिचे योगदान दिले. तिने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेतल्या, याबरोबर एक अर्धशतकही केले.

तसेच तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातही 78 धावांची खेळी केली. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडेतही 5 विकेट्स घेतल्या. तिने डिसेंबर 2023 मध्ये 225 धावा केल्या, तसेच 19 विकेट्स घेतल्या.

India Women's Cricket Team
ICC Awards 2023: सर्वोत्तम कसोटीपटूसाठी भारताच्या एकमेव खेळाडूला नामांकन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडूही शर्यतीत

झिम्बाब्वेच्या प्रेशियस मारंगेने महिला टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या आफ्रिका विभागातच्या पात्रता स्पर्धेत डिसेंबरमध्ये शानदार कामगिरी करताना 13 विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेने ही स्पर्धा जिंकत टी20 वर्ल्डकपमधील स्थानही पक्के केले.

अशी राहिली कमिन्स, फिलिप्स अन् तैजुलची कामगिरी

कमिन्सने डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामने खेळले. त्याने 2 कसोटीत 13 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन फिलिप्सने 5 डावात 137 धावा करण्याबरोबरच 3 विकेट्स घेतले. याशिवाय तैजुलने बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळताना 5 विकेट्स घेतल्या आणि 20 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com