World Cup 2027: IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याचा महाविक्रम! तिकिटांसाठी आले तब्बल 84 लाख अर्ज; फायनललाही टाकले मागे

ODI World Cup 2027 India vs Pakistan Match Date: आयसीसी वन-डे वर्ल्ड कप 2027 मधील भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज महामुकाबल्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
ODI World Cup 2027 India vs Pakistan Match Date
ODI World Cup 2027 India vs Pakistan Match DateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ODI World Cup 2027 India vs Pakistan Match Date: आयसीसी वन-डे वर्ल्ड कप 2027 मधील भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज महामुकाबल्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. 10 ऑक्टोबर 2027 रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक वॉन्डरर्स स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. या महामुकाबल्याचे तिकिट मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये एवढी क्रेझ आहे की, आयसीसीकडे तब्बल 84 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, तिकिटांच्या मागणीच्या बाबतीत भारत-पाकिस्तान सामन्याने वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यालाही मागे सोडले, ज्यामुळे क्रिकेट जगतात या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. वर्ल्ड कप 2027 चे संयुक्त यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया भूषवत आहेत. 21 नोव्हेंबर 2027 रोजी होणाऱ्या फायनल सामन्यासाठी सुमारे 79 लाख 944 लोकांनी अर्ज केले, तर भारत-पाक सामन्यासाठी 84 लाख अर्ज आल्याने ब्रॉडकास्टर्स आणि आयसीसीसाठी हा सामना व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ODI World Cup 2027 India vs Pakistan Match Date
Ind vs Pak: शशांक सिंहची वादळी खेळी व्यर्थ! महामुकाबल्यात पाकिस्तानने मारली बाजी; भारताचा 4 गडी राखून पराभव

34 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या वॉन्डरर्स स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारत आपला एकछत्री अंमल कायम ठेवण्यासाठी उतरेल. कारण, वन-डे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघ आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. या प्रवासात भारतीय संघ 7 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धही एक महत्त्वाचा सामना खेळणार आहे.

ODI World Cup 2027 India vs Pakistan Match Date
Pakistan Cricket Team Fixing: यांना लाज कशी वाटत नाही? पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप! PCB ने सुरु केली चौकशी

यावेळच्या वर्ल्ड कपच्या फॉरमॅटनुसार, भारत (India) आणि पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि एका क्वालिफायर संघासोबत एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड आणि एक क्वालिफायर संघ असेल. दोन्ही ग्रुपमधून अव्वल तीन आणि चौथ्या क्रमांकाचे संघ 'सुपर 7' टप्प्यासाठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील आणि शेवटी विजेतेपदासाठी फायनल सामना रंगेल. मात्र, सध्या सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष 10 ऑक्टोबरच्या या महामुकाबल्याकडेच लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.