World Cup 2023: श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, 'या' खेळाडूंना संधी मिळेल का?

India vs Sri Lanka ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आता टीम इंडियाचा सामना 2 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे मैदानावर श्रीलंकेशी होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करायचे आहे.

रोहित-शुभमन सलामीवर जोडी

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी दमदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने उत्कृष्ट शतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 6 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, शुभमन गिलला आतापर्यंत त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. चालू विश्वचषकात त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित-शुभमन जोडी सलामीवीर म्हणून मैदानात उतरेल. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येणे निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीने अनेक मोठे सामने टीम इंडियाला जिंकून दिले आहेत. त्याने चालू विश्वचषकातील 6 सामन्यात 354 धावा केल्या आहेत.

Team India
World Cup 2023 दरम्यान इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, 'मी अभिमानाने...'

अय्यरला संधी

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अय्यरला आतापर्यंत शॉर्ट बॉल्सचा सामना करावा लागला आहे. पण सराव सत्रात हे चेंडू खूप खेळले गेले आहेत. केएल राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी आहे. राहुलला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने आपल्या कामगिरीने टीम इंडियाला सामना जिंकून दिला आहे. या सामन्यासाठी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याही उपलब्ध नाही, त्यामुळे सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. सूर्याने इंग्लंडविरुद्ध 49 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती.

गोलंदाजी बदलत कठीण!

जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मोहम्मद शमीला त्याला साथ देण्याची संधी मिळू शकते. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शमीने गेल्या दोन सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. फिरकी डिपार्टमेंटची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर आहे.

Team India
World Cup 2023: न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ठरला 'बेस्ट फील्डर'; किंग कोहलीला सोडले मागे

श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com