World Cup 2023: ऑस्ट्रेलिया की द. आफ्रिका, भारताविरुद्ध कोण खेळणार फायनल? कोलकातामध्ये थरार, पाहा 'प्लेइंग-11'

Australia vs South Africa Semi-Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकली असून दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.
Australia vs South Africa
Australia vs South Africa

ICC ODI Cricket World Cup 2023, South Africa vs Australia Semi-Final:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (16 नोव्हेंबर) कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. दक्षिण आफ्रिकेने लुंगी एन्गिडीच्या जागेवर ताब्राईज शम्सीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे, तर ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिस आणि सीन ऍबॉटच्या जागेवर ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दरम्यान, या सामन्यात विजय मिळवणारा संघ 19 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध अहमदाबादला अंतिम सामना खेळणार आहे. भारताने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे.

Australia vs South Africa
World Cup 2023: विराट, श्रेयस अन् शमी..., टीम इंडिया 12 वर्षांनी फायनलमध्ये पोहण्याची 5 कारणे

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सहाव्या वर्ल्डकप विजयासाठी प्रयत्नशील आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी उत्सुक असेल.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्डकप 2023 स्पर्धेत साखळी फेरीचा सामना लखनऊला झाला होता, ज्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता.

आमने-सामने आकडेवारी

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आत्तापर्यंत 109 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 50 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर 55 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तसेच 3 सामने बरोबरीत सुटलेत, तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

त्याचबरोबर हे दोन संघ वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत, ज्यातील 3 सामने ऑस्ट्रेलियाने आणि 3 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

त्याचबरोबर 1 सामना बरोबरीत सुटला होता. हा बरोबरीत सुटलेला सामना 1999 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीतच झाला होता. त्यावेळी गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचे स्थान वर असल्याने त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला होता.

Australia vs South Africa
Team India: फायनलमध्ये पोहचण्याचा आनंद अन् चहलची ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री; BCCI ने शेअर केला BTS व्हिडिओ

त्याचबरोबर कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 3 वनडे सामने खेळले आहेत, ज्यातील दोन सामने त्यांनी जिंकले, तर 1 सामना पराभूत झाला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने कोलकातामध्ये 5 सामने खेळले आहेत, यातील 2 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने पराभूत झाले आहेत.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन

  • दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), तेंबा बावुमा (कर्णधार), रस्सी वॅन डर द्युसेन, एडेन मार्करम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तब्राईज शम्सी

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com