World Cup 2023: रोहितच्या उत्तरानं बुचकाळ्यात पडलेल्या बटलरच्या मदतीला आला बाबर, पाहा Video

Rohit Sharma: वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी पत्रकाराच्या प्रश्नाला रोहितने दिलेले उत्तर बटलरला बाबर आझम समजावून सांगताना दिसला होता.
 Rohit Sharma | Jos Buttler | Babar Azam
Rohit Sharma | Jos Buttler | Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Babar Azam explain Rohit Sharma's answer to Jos Buttler during ICC ODI World Cup Captains Day:

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बुधवारी (4 ऑक्टोबर) अहमदाबादला सहभागी 10 संघांचे कर्णधार 'कॅप्टन्स डे'साठी एकत्र आले होते, यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या.

बुधवारी सर्व संघांच्या कर्णधारांची एका हॉलमध्ये माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि ओएन मॉर्गन यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनीही काही प्रश्न कर्णधारांना विचारले. यादरम्यान एक गमतीशीर घटनाही झाली.

 Rohit Sharma | Jos Buttler | Babar Azam
World Cup 2023 Schedule: विराटच्या बर्थडेला आफ्रिकेचं आव्हान! 9 शहरात रंगणार भारताचे सामने; पाहा वेळापत्रक

या कार्यक्रमावेळी एका पत्रकाराने भारताचा कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारला की २०१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सुपर ओव्हरनंतरही बरोबरी झाली होती, त्यानंतर बाउंड्री काउंट नियम वापरून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते; पण त्याऐवजी दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद द्यायला हवे होते का?

या प्रश्नावर उत्तर देण्यापूर्वी रोहित काहीसा वैतागून म्हणाला काय आहे हे? त्यानंतर त्याने उत्तर दिले की 'काहीही घोषित करणे माझे काम नाहीये.' रोहितच्या या उत्तरानंतर संपूर्ण हॉलमध्ये हशा पिकली.

रोहितचे उत्तर ऐकून त्याचवेळी तिथे बसलेला इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने शेजारी बसलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला काय झालं विचारले. त्यानंतर बाबर आझम बटलरला घडलेली घटना समजावताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 Rohit Sharma | Jos Buttler | Babar Azam
Asian Games: हॉकीत गोल्ड मेडलची संधी! भारतीय संघाचा कोरियाला नमवत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश

दरम्यान, या 2019 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने होते.

यावेळी दोन्ही संघात 50-50 षटकांनंतर बरोबरी झाली होती, त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे इंग्लंडने पहिल्यांदा वनडेचे विश्वविजेतेपद जिंकले, तर न्यूझीलंड उपविजेते राहिले.

10 संघात रंगणार थरार

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत.

या 10 संघात मिळून 46 दिवसात 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या गत विजेत्या आणि गत उपविजेत्या संघांमध्ये अहमदाबादला खेळवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com