'ICC आता एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बनली' इंग्लंडच्या माजी कर्णधाराने फटकारले

अलीकडच्या काळात, अचानक सामने रद्द झाल्यानंतर मंडळाच्या प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ICC
ICCDainik Gomantak
Published on
Updated on

इंग्लंडचे (England) माजी कर्णधार मायकल अथरटन (Michael Atherton) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) टीका केली आहे. अलीकडच्या काळात, अचानक सामने रद्द झाल्यानंतर मंडळाच्या प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानला पोहोचलेल्या न्यूझीलंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आपला दौरा रद्द केला. त्यानंतरही इंग्लंडनेही आपला पाकिस्तान दौराही रद्द केला. पाकिस्तानच्या (Pakistan) माजी खेळाडूंनीही यासाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डावर टीका केली होती. असेही म्हटले गेले होते की, जेव्हा कोरोनाची लस आली नव्हती, तेव्हा पाकिस्तान संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला होता.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अथरटनने म्हटले की, फ्रँचायझी-आधारित क्रिकेट लीगमध्ये फक्त पैशाचा विचार केला जातो, आणि खेळाडू मजबूत झाले मात्र आयसीसी कमकुवत झाली आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था समजल्या जाणाऱ्या आयसीसीचे आता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये रूपांतर झाले आहे.

ICC
ICC Women ODI Rankings: मिताली राज वनडे क्रमवारीत अव्वलच, पहा टॉप 10

भारत कसोटी मालिकेची शेवटचा कसोटा सामना खेळला नाही

दरम्यान, इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या मतानुसार, आयसीसी खेळाच्या नैतिक मुद्द्यांकडे किंवा त्याच्या त्याच्या हेतूकडे कमी लक्ष देत आहे. वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. ते पुढे म्हणाले, जुलैपासून आयसीसीकडे एक कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी होते. या महिन्याच्या सुरुवातीला, पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडबरोबर होणारा 5 वा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. त्याचे कारण टीम इंडियाने टीममधील सपोर्ट स्टाफ सदस्यांचा COVID-19 अहवाल पॉझिटिव्ह आला.

पैशांनी खेळाडूंना बळकट केले

एथरटन पुढे म्हणतात की, जगभरातील फ्रँचायझी-आधारित क्रिकेट लीगमध्ये पैशाचा वारेमाप खर्च केले जात आहे. यामुळे खेळाडू अधिक शक्तिशाली बनले आहेत. ते पुढे म्हणाले की, खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधीही मिळाली आहे. आयपीएल करारांमुळे अनेक इंग्लिश खेळाडूंनी न्यूझीलंड (New Zealand) मालिकेसाठी अनुपलब्ध राहणे पसंत केल्याचा दावा केला.

ICC
ICC T20 World Cup 2021: रमीज राजा अध्यक्ष होताच पीसीबीच्या ताफ्यात २ दिग्गजांची भर

निर्णय आश्चर्यकारक होता

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) करारबद्ध खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी दोन महिन्यांची सूट देण्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तथापि, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो यांच्यासह अनेक स्टार इंग्लिश खेळाडूंनी विविध कारणांचा हवाला देत स्पर्धा पुन्हा सुरु होण्याच्या काही दिवस आधी दुबईत आयपीएल 14 च्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com