ICC T20 World Cup 2021: रमीज राजा अध्यक्ष होताच पीसीबीच्या ताफ्यात २ दिग्गजांची भर

फलंदाज मॅथ्यू हेडन आणि गोलंदाज वेरनॉन फिलँडर, प्रशिक्षक म्हणून नियुक्त
Matthew Hayden and Vernon Philander appointed as coaches of PCB (ICC T20 World Cup 2021)
Matthew Hayden and Vernon Philander appointed as coaches of PCB (ICC T20 World Cup 2021)Tweeter / @ESPNcricinfo
Published on
Updated on

रमीज राजा पीसीबीचे अध्यक्ष (PCB President Rameez Raja) बनताच पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल झाला आहे. आगामी टी -20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2021) लक्षात घेऊन पीसीबीने (PCB) महान ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेरनॉन फिलँडर (Matthew Hayden and Vernon Philander) यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. पीसीबीचे चेअरमन हेडनबद्दल म्हणाले, 'ऑस्ट्रेलियन खेळाडू संघात थोडी आक्रमकता आणू शकतो. हेडनला विश्वचषकाचा अनुभव आहे आणि तो स्वतः जागतिक दर्जाचा खेळाडू होता. ड्रेसिंग रूममध्ये ऑस्ट्रेलियन मार्गदर्शक असणे आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Matthew Hayden and Vernon Philander appointed as coaches of PCB (ICC T20 World Cup 2021)
धोनीला वर्ल्ड कप मिशनसाठी निवडण्याचं कारण...

त्याचवेळी, फिलँडरबद्दल, राजा म्हणाला, 'मी त्याला खूप चांगले ओळखतो, त्याला गोलंदाजीचे बारकावे समजतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा एक मोठा विक्रम आहे. 'टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर लगेचच मिसबाह-उल-हक आणि वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पीसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की वकार आणि मिसबाह यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे, आणि माजी कसोटीपटू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक यांना अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com