World Cup Qualifier 2023: श्रीलंकेची वर्ल्डकपमध्ये दणक्यात एन्ट्री! फायनलमध्ये नेदरलँड्सचा 105 धावांत धुव्वा

Sri Lanka: वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेचे विजेतेपद श्रीलंकेने फायनलमध्ये नेदरलँड्सला पराभूत करत जिंकले आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sri Lanka won ICC Cricket World Cup Qualifiers 2023: झिम्बाब्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेचे विजेतेपद दसून शनकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने मिळवले आहे. रविवारी (9 जुलै) हरारेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा 128 धावांनी दारुण पराभव केला.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवत श्रीलंका आणि नेदरलँड्सने यापूर्वीच भारतात होणाऱ्या मुख्य वर्ल्डकप 2023 स्पर्धेची पात्रता मिळवली होती. त्यामुळे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे 10 संघ निश्चित झाला. दरम्यान, श्रीलंकेने क्वालिफायरचा अंतिम सामना जिंकत वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दणक्यात प्रवेश केला आहे. संपूर्ण क्वालिफायर स्पर्धेत श्रीलंका संघ अपराजित राहिला.

Sri Lanka
World Cup 2023 Qualifiers: क्रिकेट भारतीयांच्या रक्तातच! जन्माने भारतीय असलेले 'हे' क्रिकेटर गाजवताहेत आखाती देशाचे मैदान

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्ससमोर विजयासाठी २३४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण नेदरलँड्सचा संघ 23.3 षटकातच 105 धावांवर सर्वबाद झाला.

नेदरलँड्सकडून मॅक्स ओडाऊनने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तसेच लोगन बॅन बिकने २० धावांची खेळी केली. त्याचबरोबर सलामीवीर विक्रमजीत सिंगने 13 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

श्रीलंकेकडून महिश तिक्षणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच दिलशान मदुशनकाने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय वनिंदू हसरंगाने 2 विकेट्स घेतल्या.

Sri Lanka
World Cup 2023: 'हे' 5 संघ पोहचू शकतात सेमी-फायनलमध्ये, गांगुलीची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही दिली प्रतिक्रिया

तत्पुर्वी, नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेकडून सहन अराचचिगेने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली.

तसेच यष्टीरक्षक कुशल मेंडिसने 43 धावांची खेळी केली. याशिवाय चरिथ असलंकाने 36 धावांची, पाथम निसंकाने 23 धावांची आणि अखेरीस वनिंदू हसरंगाने 29 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली केल्या. त्यामुळे श्रीलंकेने 47.5 षटकात सर्वबाद 233 धावा केल्या होत्या.

नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिक, रायन क्लेईन, विक्रमजीत सिंग आणि साकिब झुलफिकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर्यन दत्तने 1 विकेट घेतली.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळणार हे 10 संघ

दरम्यान, क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या श्रीलंका आणि नेदरलँड्सने वर्ल्डकप 2023 मध्ये प्रवेश केल्याने 10 संघ मिळाले आहेत. श्रीलंका आणि नेदरलँड्सपूर्वी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.