World Cup 2023 दरम्यान अहमदाबादमधील हॉटेल मालकांची चांदी! एका रात्रीचं भाडं ऐकून बसेल शॉक

भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून क्रिकेट चाहत्यांनी सामने पाहाण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
World Cup 2023
World Cup 2023Dainik Gomantak

ICC Cricket World Cup 2023, Ahmedabad's hotel Price: वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (27 जून) घोषित केले आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर अशी 46 दिवस भारतात होणार आहे. आता या स्पर्धेसाठी 100 दिवसच राहिले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सामने पाहाण्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

या स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला सामना आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर होणार आहे. तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना देखील याच स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे अहमदाबादमधील सध्या हॉटेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

World Cup 2023
World Cup 2023: सचिनसाठी वर्ल्डकप जिंकला, तसा 'या' खेळाडूसाठी जिंका, दिग्गजाचे टीम इंडियाला साकडे

वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 100 पेक्षाही कमी दिवस राहिल्याने केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी सामन्यांबरोबरच पर्यटनाचाही आनंद घेण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचमुळे आता हॉटेल्समधील रुम्सचेही स्पर्धेच्या काळातील बुकिंग होणे सुरू झाले आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार अहमदाबादमधील फाईव्ह स्टार हॉलेटमधील साधारण रुमचे भाडे स्पर्धेच्या काळात एका रात्रीसाठी 50 हजाराच्या आसपास आहे. या रुम्सचे भाडे सामान्यवेळी साधारण 6 हजार ते 11 हजार रुपयांपर्यंत असते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादमधील आयटीसी नर्मदा हॉटेलचे जनरल मॅनेजर किनम मॅकेन्झी यांनी माहिती दिली आहे की भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यानच्या काळातील बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहेत. तसेच अन्य सामन्यांदरम्यानही जवळपास सर्व रुम्सचे बुकिंग पूर्ण होऊ शकते.

World Cup 2023
World Cup Qualifiers 2023: वेस्ट इंडिज वर्ल्डकप 2023 मधून होणार बाहेर? माजी विश्वविजेत्यांसमोर असे आहे समीकरण

त्याचबरोबर हयात रेजेन्सी हॉटलचे जनरल मॅनेजर पुनित बैजल यांनीही सामन्यांच्या काळातील जवळपास 80 टक्के रुम्स बुक झाल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी सांगितले आहे की इंग्लंडमधील आणि इतर ट्रॅव्हल एजन्सींनी बुकिंग आधीच करून ठेवले आहेत.

Ahmedabad's hotel
Ahmedabad's hotelScreengrab

तसेच सुत्रांनुसार बेस कॅटेगरीच्या रुमसाठी जवळपास 52 हजार रुपये, तर प्रीमियर कॅटेगरीसाठी साधारण 1 लाख रुपये इतके रुमचे भाडे आहे. त्याचबरोबर फोर स्टार असलेल्या हॉटेलमध्येही रुमचे भाडे जवळपास 20 हजाराच्या पुढे आहे.

Ahmedabad's hotel
Ahmedabad's hotelScreengrab

दहा शहरात होणार सामने

वर्ल्डकप 2023 मधील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील. त्यामुळे अहमदाबादशिवाय या शहरांमध्येही ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com