दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय मालिका खेळणार का? विराट कोहलीने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला जाणून घ्यायची आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी विराट कोहलीने रजा मागितल्याचे वृत्त आहे, मात्र या वृत्तावर बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांकडून एक मोठे अपडेट समोर आले आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेण्याची कोणतीही औपचारिक विनंती केलेली नाही.
दरम्यान, सेंच्युरियन येथे 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली भारताचे नेतृत्व करेल. 15 जानेवारीला केपटाऊनमध्ये तिस-या आणि शेवटच्या कसोटीसह कसोटी मालिकेची समाप्ती होईल. यानंतर 19 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. उपकर्णधार रोहित शर्मा डाव्या पायाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कोहली कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
विराट कोहलीने रजा मागितली नाही!
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या जबाबदारीवर सांगितले की, “कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांना वनडेत न खेळण्यासाठी आतापर्यंत कोणतीही औपचारिक विनंती पाठवलेली नाही. नंतर निर्णय घेतला गेला किंवा त्याला दुखापत झाली तर वेगळी बाब आहे.'' मात्र विराट कोहली 19, 21 आणि 23 जानेवारीला होणाऱ्या तीन वनडेत खेळणार आहे.'
श्रीलंका मालिकेसाठीही बायो बबलमध्ये राहावे लागेल
श्रीलंकेचा संघ कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येत असल्याने भारताला पुन्हा एकदा मायदेशी परतल्यावर तीन आठवडे बायो बबलमध्ये राहावे लागणार आहे. मुलगी वामिकाच्या पहिल्या वाढदिवसामुळे (11 जानेवारी) कोहलीही ब्रेक घेऊ शकतो, अशीही बातमी समोर येत आहे. त्या दिवशी कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. गेल्या वर्षी, कोहली 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पितृत्व रजेवर होता आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतही तो घरच्या मैदानावर खेळला नव्हता. आता कोहली दक्षिण आफ्रिकेत विश्रांती घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.