Virat Kohli - Faf du Plessis partnership: डू प्लेसिसबरोबर यशस्वी पार्टनरशीपमागे टॅट्यूचं गुपीत? खुद्द विराटनंच केला खुलासा

आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट आणि फाफ डू प्लेसिसमध्ये विक्रमी भागीदारी झाली आहे.
Virat Kohli and Faf du Plessis
Virat Kohli and Faf du PlessisDainik Gomantak

Virat Kohli - Faf du Plessis partnership: गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 65 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयात कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे मोठे योगदान राहिले.

या दोघांनीही शानदार खेळ केला. दरम्यान, विराटने या सामन्यानंतर डू प्लेसिसबरोबरच्या यशस्वी भागीदारीमागील मजेदार कारणही स्पष्ट केले.

या सामन्यात हैदराबादने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट आणि डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी भागीदारी केली होती. त्यामुळे बेंगलोरने 19.2 षटकातच 2 विकेट्स गमावत 187 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले होते.

Virat Kohli and Faf du Plessis
Virat-Anushka Video Call: पहिला फोन बायकोलाच...! RCB ने मॅच जिंकताच विराट अन् अनुष्काचा रोमँटिक व्हिडिओ कॉल व्हायरल

या सामन्यात विराटने शतकी खेळी केली. त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. तसेच डू प्लेसिसने 47 चेंडूत 71 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

विराट आणि डू प्लेसिसने या हंगामात आत्तापर्यंत 13 सामन्यांमध्ये मिळून 795 धावा केल्या आहेत. त्यामुळे एका हंगामात सलामी जोडीने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळे सामन्यानंतर विराटला डू प्लेसिसबरोबरील भागीदारीबद्दल विचारण्यात आले.

त्यावर बोलताना विराट हसून म्हणाला, 'मला वाटते आमच्या भागीदारीचे रहस्य आमचे टॅट्यू आहेत. आम्ही या हंगामात जवळपास एकत्र 900 धावा केल्या आहेत. हे असेच आहे जसे मला एबी डिविलियर्सबरोबर फलंदाजी करताना वाटायचे.'

'खेळ कुठे चालला आहे आणि आम्हाला काय करावे लागणार आहे, याची समज आम्हाला आहे. याशिवाय आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो. आम्ही परिस्थिती समजून एकमेकांना फिडबॅक देत असतो आणि मग ठरवतो की कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कसे खेळायचे आहे.'

Virat Kohli and Faf du Plessis
Faf du Plessis: जिगरबाज फाफ! जखमी पोटाला बँडेज बांधूनही फिफ्टी ठोकत CSK ला दिलेलं टेंशन

तसेच विराट पुढे म्हणाला, 'फाफ एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले आहे. वरच्या फळीत बेंगलोरसाठी एकत्र येणे आणि प्रभाव पाडणे, हा एक आमच्यासाठी चांगला बदल ठरला आहे.'

दरम्यान, विराट आणि डू प्लेसिस या दोघांसाठीही आयपीएल 2023 स्पर्धा खास ठरली आहे. डू प्लेसिस या हंगामात ७०० धावा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

त्याने 13 सामन्यांमध्ये 58.50 च्या सरासरीने 702 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विराटने या हंगामात 13 सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने 538 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com