Avesh Khan on Celebration: RCB विरुद्धच्या सेलिब्रेशनवर आवेशचे मोठे भाष्य; म्हणाला, 'हेल्मेट फेकणे जरा...'

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध हेल्मेट फेकत केलेल्या सेलिब्रेशनबद्दल आवेश खानने प्रतिक्रिया दिली आहे.
Avesh Khan
Avesh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Avesh Khan on Celebration against RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर केलेले सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत आले होते. आता यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

झाले असे की बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आवेशने लखनऊसाठी सामन्यातील अखेरच्या चेंडूवर विजयी धाव काढली होती. त्यानंतर त्याने त्याचे हेल्मेट जमिनीवर फेकत जोरदार सेलिब्रेशन केले होते.

त्याच्या या सेलिब्रेशनचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी त्याच्यावर टीकाही केलेली. दरम्यान, आवेशने या सेलिब्रेशनबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. पण त्यावेळी त्या क्षणाच्या आवेगात झाल्याचेही त्याने सांगितले.

Avesh Khan
Virat Kohli - Naveen-ul-Haq Fight: 'विराटनेच भांडण सुरु केले अन्...', दीड महिन्याने नवीनचा IPL 2023 मधील वादाबद्दल मोठा खुलासा

त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'सोशल मीडियावर माझा माहोल नेहमीच बनलेला असतो. हेल्मेट सेलिब्रेशन जरा जास्तच झआले होते. मला ते नंतर जाणवले की मी असे नव्हते करायला हवे. ते फक्त त्याक्षणाच्या आवेगात झाले. आता मला वाईट वाटत आहे की मी अशा गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे.'

याशिवाय आवेशने असेही सांगितले की यावर्षीपेक्षा मागील दोन हंगाम त्याच्यासाठी खास ठरले होते. आयपीएल 2023 मध्ये वेगवान गोलंदाजांना बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान, आवेशला या हंगामात 9 सामन्यात 8 विकेट्सच घेता आल्या आहेत.

Avesh Khan
Team India मध्ये वाहणार बदलाचे वारे? वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 'या' IPL स्टार्सला मिळू शकते संधी

याबद्दल तो म्हणाला, 'जर तुम्ही या हंगामापूर्वीचे माझे दोन्ही आयपीएल हंगामांची तुलना केली, तर ते माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले होते. जरी माझा हा हंगाम माझ्या स्टँडर्डनुसार चांगला गेला नसेल, तरी मी माझा इकोनॉमी रेट नियंत्रित ठेवला होता, जो 10 पेक्षाही कमी होता. मी 4 आणि 5 ही महत्त्वाची षटके टाकली होती आणि डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी केली होती.'

आवेशने 9.76 च्या इकोनॉमी रेटने आयपीएल 2023 मध्ये गोलंदाजी केली. त्याने 2021 मध्ये 16 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या आणि 2022 मध्ये 13 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com