Mohammad Shami: 'गुजरातमध्ये आहे तर आवडीचे जेवण मिळेना, पण...', शमीचं उत्तर ऐकून शास्त्रींनाही आवरलं नाही हसू

रवी शास्त्रींनी डाएटबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमीने गमतीशीर उत्तर दिले आहे.
Mohammad Shami
Mohammad ShamiDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammad Shami Funny Statement: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघास नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 34 धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात मोहम्मद शमीने महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 4 षटकांमध्ये 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने हैदराबादच्या अनमोलप्रीत सिंग, कर्णधार एडन मार्करम, राहुल त्रिपाठी आणि हेन्रिक क्लासेन यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे सध्या त्याच्याकडे आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल पर्पल कॅपही आहे.

त्यामुळे आयपीएल 2023 मध्ये शानदार कामगिरी करत असल्याचे पाहून भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोमवारी झालेल्या सामन्यानंतर त्याला त्याच्या डाएटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर शमीने अतिशय गमतीशीर उत्तर दिले. शास्त्री सध्या आयपीएल 2023 मध्ये समालोचन करत आहेत.

Mohammad Shami
IPL 2023 Playoff equation: गुजरातचं स्थान पक्कं! आता प्लेऑफच्या 3 जागांसाठी 7 संघात शर्यत, पाहा समीकरण

शमीचं गमतीशीर उत्तर

शास्त्री यांनी शमीला विचारले की 'तू काय खातो? तू दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहेस. आता दिड महिना होत आला आहे, उष्णताही वाढत आहे, पण तरी तुझी धावण्याची गती आणखी वाढत आहे.'

यावर मजेने मोहम्मद शमीने उत्तर दिले की 'गुजरातमध्ये आहे, इथे मला आवडणारे पदार्थ नाही मिळत. पण गुजराती पदार्थांची मजा घेत आहे.' शमीचे हे गमतीशीर उत्तर ऐकून शास्त्रीही हसू लागले.

याशिवाय शमीने त्याच्या गोलंदाजीबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, 'मी माझ्या सामर्थ्यावर लक्ष्य केंद्रित करतो आणि किफायतशीर षटके करण्याचा प्रयत्न केला. मी नेहमीच योग्य क्षेत्रात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.'

Mohammad Shami
Bhuvneshwar Kumar Record: भुवीचा विकेट्सचा पंजा! 'हा' कारनामा करणारा IPL इतिहासातील केवळ दुसराच भारतीय

गुजरात प्लेऑफमध्ये

सोमवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर गुजरातने या हंगामाच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे.

या सामन्यात गुजरातने शुभमन गिलच्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, फझलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 9 बाद 154 धावा करता आल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने चांगली फलंदाजी करताना 64 धावांची खेळी केली. तसेच भुवनेश्वर कुमारने 27 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच यश दयालने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com