हैदराबाद ISL च्या अंतिम फेरीच्या दिशेने

ISL : एटीके मोहन बागानला 3-1 फरकाने नमविल्याने काम सोपे
Hyderabad
Hyderabad kishor petkar

पणजी : हैदराबाद एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीच्या दिशेने कूच करताना शनिवारी एटीके मोहन बागानला निष्प्रभ केले. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात पिछाडीवरून येत त्यांनी 3-1 फरकाने विजय नोंदविला आणि गोलसरासरीही सरस केली. (Hyderabad towards ISL finals)

सामना बांबोळी (Bamboli) येथील ॲथलेटिक स्टेडियमवर (Athletic Stadium) झाला. फिजी देशाचा रॉय कृष्णा याने मोसमातील पाचवा गोल नोंदवत एटीके मोहन बागानला 18व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. हा गोल लिस्टन कुलासोच्या शानदार असिस्टवर झाला. नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याने 45+2व्या मिनिटास मोसमातील अठरावा गोल नोंदविला.

त्याचे हेडिंग अचूक ठरल्याने हैदराबादला बरोबरी साधता आली. नंतर उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल झाले. 58व्या मिनिटास यासीर महंमद याने डाव्या पायाच्या फटक्यावर मोसमातील पहिलाच गोल केला. 64व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू हावियर सिव्हेरियो याने यासीरच्या असिस्टवर हेडिंगद्वारे लक्ष्य साधल्यामुळे हैदराबादची स्थिती मजबूत झाली. त्याचा हा मोसमातील सातवा गोल ठरला.

Hyderabad
खोर्ली इलेव्हन उत्तर विभागीय विजेते

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढत 16 मार्च रोजी होईल. त्यावेळी हैदराबादला बरोबरीही पुरेशी असेल, तर एटीके मोहन बागानला (ATK Mohan Bagan) विजय मिळविला तरीही -2 गोलपिछाडी भरून काढावी लागेल.

साखळी फेरीत दुसरा क्रमांक मिळविलेल्या मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने यापूर्वीच्या पराभवाचा बदला घेतला. साखळी फेरीतील पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) व हैदराबाद यांच्यातील लढत 2-2 गोलबरोबरीत राहिली होती. नंतर दुसऱ्या टप्प्यात हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 2-1 असा विजय प्राप्त केला होता. शनिवारी सेटपिसेस व्यूहरचनेत हैदराबाद संघ सरस ठरला. त्यांचे तीनपैकी दोन गोल कॉर्नरवरील फटक्यावर झाले. हैदराबादने पूर्वार्धातील भरपाई वेळेत बरोबरी साधल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

Hyderabad
UP Election 2022 : यूपीत भाजप जिंकली; तरीही तीन जागी झाले डिपॅाझिट जप्त

ओगबेचे याची विक्रमाशी बरोबरी

आयएसएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी शनिवारी हैदराबादच्या (Hyderabad) नायजेरियन (Nigerian) बार्थोलोम्यू ओगबेचे याने बरोबरी साधली. या 37 वर्षीय आघाडीपटूने यंदा 18 सामन्यांत 18 गोल केले असून गोल्डन बूटच्या (Golden Boot) शर्यतीत तो सर्वांत पुढे आहे. एफसी गोवाचा स्पॅनिश (Spanish) आघाडीपटू फेरान कोरोमिनास याने 2017-18 मोसमातील 20 सामन्यांत 18 गोल नोंदविले होते. ओगबेचे याने आयएसएलमधील (ISL) 75 लढतीत सर्वाधिक 53 गोलसह अग्रक्रम मिळविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com