PM Gati Shakti : "राज्यांना विशेष सहाय्य अंतर्गत गोवा राज्य सरकारला पन्नास वर्षांसाठी कर्ज देण्यात आले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे प्रकल्पासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद केली आहे," असे मंत्रालयाच्या विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) सुमिता डावरा यांनी सांगितले.
गोव्यात होणाऱ्या पश्चिम आणि मध्य विभागाच्या पहिल्या प्रादेशिक कार्यशाळेपूर्वी राज्याच्या राजधानीत आयोजित पत्रकार परिषदेत डावरा बोलत होते.
गोव्याने लाटंबार्से औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी निधीची मागणी केली होती, परंतु सध्या केलेल्या निधिचे वाटप अपुरे आहे.
"गोव्याला पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत 19 कोटी रुपये मिळाले आहेत. गोवा औद्योगिक विकास महामंडळ त्याचा उपयोग वेर्णातील औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्याचा विकास करण्यासाठी करणार आहे."
"उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (DPIIT) विभागाने मंजूर केलेला निधी अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी तसेच वीज आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आणि औद्योगिक वसाहतीतील इतर पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल," असे एका सरकारी अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
"पैसे आधीच मिळाले होते त्यामुळे आम्ही वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्याचा विकास हाती घेतला आहे. लाटंबार्से औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी तेथे अनेक समस्या आहेत. त्यासाठी आम्ही अतिरिक्त मंजुरी देखील मागितली होती. मात्र, आम्हाला फक्त 19 कोटी रुपये मिळाले आहेत. जर ही योजना वाढवली तर आम्ही त्या योजनेचा आणखी फायदा घेऊ असे गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचान यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.