Major League Cricket: अमेरिकेत घोंगावले क्लासेन नावाचे वादळ; दक्षिण आफ्रिकन खेळाडूला MLC मध्ये शतक झळकावण्याचा मान
Major League Cricket: हेन्रिक क्लासेनने इतिहास रचला. मेजर क्रिकेट लीगच्या इतिहासात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. ऑर्कासकडून खेळत असलेल्या क्लासेनने एमआय न्यूयॉर्कविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळली.
प्रथम फलंदाजी करताना न्यूयॉर्कने 20 षटकांत 8 गडी गमावून 194 धावा केल्या. 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑर्कास संघाने 19.2 षटकांतच लक्ष्य गाठले.
क्लासेनने 44 चेंडूत नाबाद 110 धावा ठोकल्या. आपल्या झंझावाती खेळीत त्याने 9 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याने राशिद खानलाही सोडले नाही.
दरम्यान, क्लासेनने न्यूयॉर्कच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. राशिद खानच्या (Rashid Khan) एका षटकात त्याने 26 धावा ठोकल्या. क्लासेनच्या झंझावाती फलंदाजीमुळे ऑर्कासने पहिल्या 4 चेंडूत 2 गडी राखून विजय मिळवला.
त्याने अवघ्या 41 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. 16व्या षटकात रशीद खानच्या षटकात 3 षटकार आणि एक चौकार मारुन त्याने 64 धावांवरुन थेट 90 धावांपर्यंत मजल मारली.
बोल्टच्या षटकात नर्व्हस...
विसेच्या पुढच्या ओव्हरमध्ये ऑर्कासची एक विकेट पडली. तर 18व्या षटकात बोल्टने येताच कहर केला. त्याने ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूत 2 बळी घेतले. यानंतर वाईड बॉल टाकला आणि चौथ्या चेंडूवर दुसरी विकेट घेतली. त्यावेळी क्लासेन 95 धावांवर खेळत होता. बोल्टच्या या षटकात तो नर्व्हस झाला.
चौकार मारुन शतक पूर्ण केले
दुसरीकडे, 19व्या षटकात तो एहसान आदिलच्या तिसऱ्या चेंडूवर वाचला. मात्र पुढच्याच चेंडूवर चौकार मारुन त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आणखी एक चौकार मारला आणि यासह त्याचा संघ लीगमध्ये टॉप 2 मध्ये पोहोचला.
क्वालिफायर 1 मध्येही त्याने आपल्या संघाचे स्थान निश्चित केले. क्लासेनने आपल्या संघाला षटकारासह विजय मिळवून दिला. 19.2 षटकांत त्याने लाँग ऑनवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.