PSL सामन्यातील DRS मध्ये मोठी चूक, हॉक-आयने मागितली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची माफी, वाचा काय आहे प्रकरण

Hawk-Eye apologised To PCB: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये रुसौच्या बाबतीत चूकीचे बॉल-ट्रॅकिंग दाखवण्यात आल्याने हॉक-आयला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली आहे.
Quetta Gladiators
Quetta GladiatorsX/thePSLt20
Published on
Updated on

Hawk-Eye Apologised To PCB

क्रिकेटमध्ये चेंडूच्या टप्प्याचा आणि दिशेचा मोगावा घेण्यासाठी हॉक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. बऱ्याचदा डीआरएस रिव्हूमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. मात्र सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये या तंत्राने चूक केल्याने हॉक-आयला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली आहे.

झाले असे की गुरुवारी (22 फेब्रुवारी) इस्लामाबाद युनायडेट आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात युनायटेडला अवघ्या ३ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार ग्लॅडिएटर्सचा कर्णधार रिली रुसौने पटकावला. विशेष म्हणजे त्याच्याच विकेटबाबत हॉक-आयने चूक केली होती.

झाले असे की युनायटेडने 139 धावांचे आव्हान ग्लाडिएटर्सला दिले होते. यावेळी 11 व्या षटकात रिली रुसौ आणि शेरफेन रुदरफोर्ड फलंदाजी करत होते, तर युनायटेडकडून आघा सलमान गोलंदाजी करत होता.

त्याने या षटकातील 6 व्या चेंडूवर रुसौविरुद्ध पायचीतसाठी अपील केले. त्याने टाकलेला चेंडू रुसौच्या बॅटला चूकवत स्टंपच्या समोरच फ्रंट पॅडला लागला होता.

Quetta Gladiators
IND vs ENG: जडेजाच्या फिरकीने संपवला इंग्लंडचा डाव, जो रुट-रॉबिन्सनची झुंजार खेळीने पाहुण्यांच्या 353 धावा

त्यावेळी पंच अलीम दार यांनीही रुसौला बाद दिले. त्यामुळे रुसौने डीआरएसची मागणी केली. या रिव्ह्यूमध्ये हॉक आयने दाखवले की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जात आहे. हा रिप्ले पाहून मैदानातील सर्वचजण चकीत झाले होते. पंच अलीम दारही चकीत होते.

मात्र रिप्लेमध्ये दिसल्याप्रमाणे पंचांनी रुसौला नाबाद घोषित केले. त्यामुळे रुसौला 13 धावांवर जीवदान मिळाले, ज्याचा फायदा घेत त्याने नाबाद 34 धावा केल्या आणि ग्लाडिएटर्सला 10 चेंडू राखून विजय मिळवून दिला.

दरम्यान, इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार सामन्यानंतर हॉक-आयला चूक लक्षात आल्याने त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नासीर आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटची पत्र लिहून माफी मागितली आहे. हॉक-आयने मान्य केले आहे की त्या चेंडूचा योग्य टप्पा आणि दिशा दाखवण्यात अपयश आले.

Quetta Gladiators
Viral Video: शोएबला PSL मध्ये सपोर्ट करायला आलेल्या सनाला पाहून प्रेक्षकांकडून सानिया मिर्झाच्या नावाने घोषणा

तथापि, युनायटेडचा कर्णधार शादाब खानेही सामन्यानंतर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले की 'मला वाटते की ही तंत्रज्ञानाची चूक आहे. आम्हाला रिव्ह्यूवेळी चूकीचा चेंडू दाखवला. मी लेग स्पिनर म्हणून 4 षटके गोलंदाजी केली. पण तेव्हा चेंडू खूप वळत नव्हता. पण या रिव्ह्युवेळी चेंडूचा इम्पॅक्ट ऑफ स्टंप दाखवला. मोठ्या स्पर्धांमध्ये अशाप्रकारच्या चूका होता कामा नयेत.'

दरम्यान, सामन्यात युनायटेडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 138 धावा केल्या होत्या. त्यानंतर 18.2 षटकात ग्लॅडिएटर्सने 7 बाद 139 धावा करत सामना जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com