Cricketer Retires: त्रिशतक झळकावणाऱ्या 'या' अनुभवी खेळाडूने विश्वचषकापूर्वी घेतली निवृत्ती, क्रिकेट विश्वात...!

Hashim Amla Retirement : एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे.
Hashim Amla
Hashim AmlaDainik Gomantak
Published on
Updated on

Hashim Amla Retirement : एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी एका अनुभवी क्रिकेटपटूने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या 39 वर्षीय फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत त्रिशतक झळकावले आहे, मात्र आता हा खेळाडू मैदानावर दिसणार नाही. या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हाशिम आमलाने निवृत्तीचा निर्णय घेतला

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) महान फलंदाजांपैकी एक असलेल्या हाशिम आमलाने सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2022 मध्ये त्याने मिळवलेल्या काउंटी चॅम्पियनशिप विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी तो मैदानात परतणार नाही. आमलाने गेल्या वर्षी त्याच्या अंतिम हंगामात काउंटी चॅम्पियनशिप जिंकली होती. विशेष म्हणजे, आमलाची कारकीर्द जवळपास दोन दशकांची होती. यादरम्यान त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.

Hashim Amla
IND vs SA 3st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

34 हजारांहून अधिक धावा

39 वर्षीय हाशिम आमलाने त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 34,104 धावा केल्या. यापैकी 2004 ते 2019 दरम्यान त्याच्या 124 कसोटी सामन्यांमध्ये 9,282 धावा आल्या. हा दक्षिण आफ्रिकेसाठी जॅक कॅलिसनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2012 मध्ये आमलाने ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध नाबाद 311 धावांची खेळी केली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 28 शतके आणि 41 अर्धशतके केली आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी फॉर्मेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे.

कोचिंग करिअरची सुरुवात

डर्बनमध्ये जन्मलेल्या हाशिम आमलाने आपल्या कारकिर्दीत 181 एकदिवसीय आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 27 शतकांसह 8113 धावा केल्या तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये त्याने 8 अर्धशतकांसह 1277 धावा केल्या. त्याने आधीच SA20 मध्ये MI केपटाऊनचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोचिंग कारकीर्द सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत तोही सामील होऊ शकतो, असे मानले जात आहे.

Hashim Amla
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती, या खेळाडूला मिळाली संधी

2019 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतली

आमलाने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक मोहिमेच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये, तो श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडला. त्यानंतर त्या वर्षाच्या शेवटी त्याने सरे संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. परदेशी खेळाडू म्हणून त्याने 2013 आणि 2014 मध्ये कौंटीचे प्रतिनिधित्व केले. तो डर्बीशायर, हॅम्पशायर, नॉटिंगहॅमशायर आणि एसेक्ससहही खेळला. त्याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com