IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती, या खेळाडूला मिळाली संधी

IND vs SA 2022 Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

IND vs SA 2022 Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत मोहम्मद शमीच्या जागी संघात सामील झालेला उमेश यादव दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेचा भाग असेल. IPL 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या उमरान मलिकला संघात स्थान मिळालेले नाही.

तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणारा पहिला वनडे

विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकाविरुध्दच्या (South Africa) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांना तीन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीच्या (Guwahati) बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तिन्ही सामने सायंकाळी 7 वाजता सुरु होतील.

Hardik Pandya
IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, संपूर्ण वेळापत्रक पाहा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवी अश्विन, यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

Hardik Pandya
IND vs SA: T20 मालिकेची उत्कंठा शिगेला पण सामन्यावर पावसाचे संकट

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ-

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिझबासो, ड्वेन प्रेटोरियस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com