Harmanpreet Kaur: हरमनप्रीतनं दाखवली जिद्द! जखमी झाल्यानंतरही पुन्हा मैदानात उतरली अन् फिफ्टीही ठोकली

INDW vs BANW: हरमनप्रीत कौरने जखमी झाल्यानंतरही पुन्हा मैदानात उतरून फलंदाजी करण्याची जिद्द बांगलादेशविरुद्धच्या वनडेत दाखवली.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

Harmanpreet Kaur return to bat despite being injured: भारतीय महिला संघाचा बांगलादेश महिला संघाविरुद्ध दुसरा वनडे सामना बुधवारी (19 जुलै) झाला. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जिद्दीचे दर्शन चाहत्यांना घडले. यासामन्यात तिने जखमी हाताने फलंदाजी केली.

झाले असे की या सामन्यात हरमनप्रीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरली होती. पण ती फलंदाजी करताना संघर्ष करत होती. त्यातच ती 36 व्या षटकात दुखापतग्रस्त झाली.

36 व्या षटकात तिने राबेया खानविरुद्ध शॉट खेळला आणि एकेरी धावेसाठी धावली. ही धाव तिने जेमिमाह रोड्रिग्ससह पूर्ण केली, पण त्यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चेंडू फेकताना तिच्या हाताला चेंडू लागला.

त्यामुळे फिजिओ मैदानात आले, त्यांनी तिला आईसपॅकही लावला. त्यानंतर तिने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने तीन चेंडू खेळल्यानंतर रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला आणि ती मैदानातून परत गेली. त्यावेळी तिने 80 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.

Harmanpreet Kaur
INDW vs BANW, T20I: टीम इंडियाने गमावली व्हाईटवॉशची संधी! अखेरच्या सामन्यात बांगलादेशची बाजी; हरमनची झुंज व्यर्थ

ती रिटायर्ड हर्ट झाल्याने हर्लिन देवोल मैदानात आली, तिने रोड्रिग्सला चांगली साथ दिली. दरम्यान रोड्रिग्सनेही अर्धशतक पूर्ण केले. पण 47 व्या षटकात 25 धावा करून हर्लिन बाद झाली. त्यामुळे हरमनप्रीतने पुन्हा मैदानात येण्याचा निर्णय घेतला. ती त्यानंतर फलंदाजी करताना संघर्ष करत होती. पण तिने 83 चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले.

अखेर तिला शेवटच्या षटकात सुलताना खातुनने बाद केले. हरमनप्रीतने मारलेल्या शॉटवर राबेया खानने शानदार झेल घेतला. त्यामुळे हरमनप्रीतला 88 चेंडूत 3 चौकारांसह 52 धावा करून माघारी परतावे लागले.

रोड्रिग्सचे अर्धशतक

दरम्यान, भारताकडून रोड्रिग्सने शानदार फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. तिने 78 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 9 चौकार मारले. ही तिची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी देखील ठरली.

Harmanpreet Kaur
INDW vs BANW, 1st ODI: बांगलादेशची एका दशकाची प्रतिक्षा संपली! भारताविरुद्ध मिळवला पहिला वनडे विजय

तिच्या आणि हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 228 धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधनानेही 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

बांगलादेशकडून सुलताना खातुन आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मारुफा अख्तर आणि राबेया खातुन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताची प्रतिष्ठा पणाला

भारतीय महिला संघाला बांगलादेश महिला संघाविरुद्ध चालू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर आहे.

त्याचमुळे दुसरा सामना मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा आहे. जर दुसरा सामना भारताने गमावला, तर मालिकाही गमवावी लागणार आहे. पण जर दुसरा सामना भारताने जिंकला, तर मालिकेतील आव्हान कायम राहिल आणि २२ जुलैला होणारा तिसरा सामना निर्णायक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com