आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे बर्मिंगहॅम येथे जुलैमध्ये सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

आयर्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने या संघाची निवड केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि स्थायी कर्णधार ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Hardik Pandya
VVS लक्ष्मण होणार आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

दरम्यान, आयर्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या उर्वरित संघाचीही तीच नावे आहेत, जी सध्याच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहेत. मात्र, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही, कारण ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याचा भाग असणार आहेत. अशा परिस्थितीत संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, आयपीएल 2022 दरम्यान मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे.

तसेच, हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे, तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असेल. दिनेश कार्तिकचा देखील संघात समावेश आहे. परंतु हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, कारण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखालीच गुजरात टायटन्स संघाने आयपीएलचा किताब जिंकला आहे.

Hardik Pandya
ICC ODI Rankings मध्ये विराट कोहलीला झटका, हा पाकिस्तानी फलंदाज गेला पुढे

दुसरीकडे, पंत व्यतिरिक्त, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह उर्वरित खेळाडू 1 ते 5 जुलै दरम्यान होणाऱ्या कसोटीसाठी गुरुवारी सकाळी यूकेला रवाना होतील. गेल्या वर्षीच्या मालिकेतील उर्वरित एका कसोटीसाठी राहुलच्या पर्यायाचा विचार केला जात नाही. कारण शुभमन गिल आणि पुजारा डावाची सुरुवात करु शकतात.

भारताचा T20 संघ खालीलप्रमाणे आहे

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com